प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूयात

वेध ताज्या घडामोडींचा,दि.१९, खारघर: कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

खारघर व्हॅलीशिल्प मध्ये राहणारे  पासी कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात. पर्यावरणाचा ऱ्हास आपणच थांबवू शकतो या भावनेतून हे कुटुंब दरवर्षी शाडूच्या मातीची प्रतिष्ठापणा करून   नैसर्गिक फुलांची सजावट करून पुर्णपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे रक्षण करतात. आणि घरीच आपल्या लाडक्या गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे रक्षण करतात.

आज आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग झालो आहोत. त्यामुळे आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येईल. गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरुपात साजरा केला जातो. तो साजरा करीत असताना पर्यावरणपूरक होईल, तसेच या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जात असल्याचे राजेश जे. पासी यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग आदींमुळे सजीवसृष्टीपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणीत केला पाहिजे. असे जे. के. पासी अभिमानाने सांगतात.

गणेशोत्सवाचा खरा उद्देश सफल करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यापरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला तर मग  गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करूया. कोणतेही सामाजिक बदल आपल्याला आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो, पण आपली मानसिकता आपण बदलली तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो. असे जे.के.पासी त्यांचा मुलगा राजेश  जे. पासी, त्यांची सून सुनीता पासी आणि पत्नी प्रेमा जे. पासी सांगतात. पर्यावरनाची हानी रोखण्यासाठी सर्वांनीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा  करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *