पाणी जीवन आहे – पण संकटात आहे!
“जल हीच जीवनरेखा आहे.
माणूस, प्राणी, झाडे आणि संपूर्ण पृथ्वी पाण्यावर अवलंबून आहे. पण आज, वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यामुळे पाण्याची टंचाई भयंकर स्वरूप धारण करत आहे.
पाणी केवळ एक नैसर्गिक संसाधन नाही, तर ते मानवाच्या अस्तित्वाचं मूलभूत अधिष्ठान आहे. याच संदर्भात आपण पाण्याचे महत्व, आजच्या निर्माण झालेल्या अडचणी, त्याचे भविष्यात होणारे भीषण परिणाम आणि त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. आज पानी वाचवले नाही तर भविष्यातील लढाया ह्या पाण्यासाठी होतील. तरीही पानी मिळणार नाही. आजूनही वेळी गेली नाही. पाण्याची बचत करा. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. मानवाला निसर्गाने कुठलीही किमत न मोजता मोफत दिली आहे. म्हणून त्याचा अतिवापर करून त्याचा अपव्यय करत आहे. पण निसर्ग मानवाला कधीच माप करणार नाही. आज जर ते वाचवल नाही तर आपल्याला घ्यायचे माहीत आहे पण द्यायचे नाही. जमिनीत पानी जिरवल तरच ते भविष्यातील स्त्रोत म्हणून टिकून राहतील अन्यथा ते नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

💦 पाणी म्हणजे काय?
पाणी हे पृथ्वीवर सर्वत्र आहे. पण केवळ 0.3% पाणीच माणसाच्या वापरासाठी योग्य आहे.
उर्वरित पाणी समुद्र, बर्फ, वायुमंडल किंवा भूमिगत स्वरूपात आहे.
यामुळेच आज प्रत्येक थेंब अनमोल आहे. म्हणूनच त्याचे बचत करणे आवश्यक आहे.
* पाण्याच्या टंचाईची प्रमुख कारणे
*वाढती लोकसंख्या व शहरीकरण
-मोठ्या प्रमाणात पान्याचा वापर – स्वयंपाक, स्नान, कारखाने, शेतजमीन.यासाठी
-नद्यांचा अति वापर व भूजल उपसणं.
-वनतोड आणि हवामान बदल
-तापमानवाढ = बाष्पीभवन अधिक, साठवलेलं पाणी कमी होत आहे.
-नद्या, विहिरी, तलाव यामध्ये सांडपाणी, रसायनं मिसळली जातात.यामुळे पाणी वापरण्यास अयोग्य होतं.
निरंकुश पाण्याचा वापर, शेतीमध्ये पुरेशा नियोजनाशिवाय पाण्याचा अपव्यय, घरगुती नळ, फ्लश, वाहने धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर.
*पर्जन्यमानातील असमानता
काही भागात अतिवृष्टी, काही भागात दुष्काळ त्यामुळे पाणी साठवणूक होत नाही.
उपाययोजना – पाणी वाचवण्यासाठी
*जलसंधारण तंत्रज्ञानाचा वापर
-छतावरील जलसंधारण (Rainwater Harvesting) सर्व घरांमध्ये सक्तीने करणे.
-नाल्यांमधून पाणी अडवून विहिरीत किंवा भूगर्भात पाठवणे.
* सूक्ष्म सिंचन – ठिबक व तुषार सिंचन
-कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी शेती.
-ठिबक सिंचनामुळं पाण्याचा अपव्यय टळतो.
* पाण्याचा काटकसरीने वापर
-ब्रश करताना नळ बंद ठेवणे, कार धुण्यासाठी बादली वापरणे.
-घरात गळके नळ/टाक्या दुरुस्त करणे.
* पुनर्वापर आणि पुनर्शुद्धीकरण
-नळाचे व सांडपाण्याचे पाणी प्रक्रिया करून बागकामासाठी वापरणे.
-सोसायट्यांमध्ये पाणी पुनर्वापर यंत्रणा बसवणे.
*. वृक्षारोपण
-झाडे जमिनीत आर्द्रता राखतात, भूजल वाढवतात.
शासनाची धोरणे योजना / उद्दिष्ट💧
कृती करणे आवश्यक आहे. दरवर्षी एक जलश्रोत दत्तक घ्या. त्यामुळे स्थानिक जलस्रोत जतन ठेवणे शक्य होईल. पाण्याचा काटकसरीने वापर करा-घरगुती वापरात बचत होते. टाक्या, गळके नळ तपासा त्यामुळे दररोज १०० लिटर पाणी वाचू शकते .शाळांमध्ये जलशिक्षण द्या त्यामुळे नवीन पिढीला पाण्याचे मूल्य कळते. समाजात जनजागृती करा त्यामुळे सामूहिक कृतीस चालना मिळते. तलावांचे रक्षण करा. नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण करा. मुख्य म्हणजे पानी बचत स्वत:पासून करा.
पाणी आहे म्हणून आपण आहोत!
आज पाण्याचं रक्षण केलं नाही, तर उद्या आपली सगळी प्रगती वाळवंटातl जाईल.
पाण्यासाठी युद्धे झाली नाहीत, पण भविष्यात ती होऊ शकतात.
म्हणून, प्रत्येक थेंब साठवा, पाण्याला जपा, जीवन वाचवा.
“पाणी हेच जीवन आहे, आणि त्याचं रक्षण हे आपलं कर्तव्य!”