“पृथ्वी ही आपली आई आहे. आपण तिचे रक्षण न करता तिचा ऱ्हास करतोय.” तिची देखभाल हे आपले परमकर्तव्य आहे.”
आज आपण विकासाच्या नावे तिच्यावर अशी घाव घालत आहोत की तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पृथ्वीचा ऱ्हास ही आता केवळ पर्यावरणाची समस्या राहिलेली नाही, तर ती सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक संकट बनली आहे.
मानवी इतिहासात विज्ञान, उद्योग, विकासाने अनेक चमत्कार घडवले, पण त्याचवेळी निसर्गाची हानी होत राहिली. आज पृथ्वी तापते आहे, आक्रोश करते आहे, आणि तिचा ऱ्हास होत असताना आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत.पण पृथ्वीचा नाश काही थांबत नाही.
आज ५ जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा ऱ्हास का होतोय, त्याचे परिणाम काय आहेत, आणि त्यावर उपाय काय असू शकतात – हे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे.
🚨 पृथ्वीचा ऱ्हास म्हणजे नेमके काय?
पृथ्वीचा ऱ्हास म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा असमतोल वापर, हवामान बदल, जैवविविधतेचा नाश, जमिनीची आणि पाण्याची गुणवत्ता कमी होणे, आणि हवा व जलप्रदूषणामुळे मानव व जीवसृष्टीला धोका निर्माण होणे.
या ऱ्हासाची गती इतकी झपाट्याने वाढली आहे की पुढच्या काही दशकांतच पृथ्वी मानवासाठी राहण्यायोग्य राहणार नाही, हा ऱ्हास केवळ निसर्गातच नाही तर मानवाच्या जगण्यावरही थेट परिणाम करतो.जेव्हा मानव पृथ्वीचे रक्षण करू शकत नाही, तेव्हा पृथ्वीही अनेक नैसर्गिक आपत्तींच्या रूपाने तिचे रौद्र रूप दाखवत असते. तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्याला शुद्ध पाणी, शुद्ध हवा, सुपीक भूमी, शुद्ध वातावरण आणि वनस्पती मिळणार नाही. या सर्वांखेरीज आपले जीवन जगणे कठीण होऊन जाईल.

🔍 ऱ्हासाची प्रमुख कारणे
* वनतोड आणि झपाट्याने वाढलेले शहरीकरण
जंगलतोड केवळ प्राण्यांचे निवासस्थानच नष्ट करत नाही, तर हवामानाच्या समतोलावरही परिणाम करते.
कार्बन डायऑक्साइडचे शोषण कमी होते, तापमान वाढते.
मुंबई, पुणे, नागपूरसारखी शहरे झपाट्याने वाढतात पण हरित क्षेत्र कमी होत आहे. सिमेंटच्या जंगलात हिरव्यागार शेतीची नासधूस. सांडपाणी, ध्वनी, वायू आणि रासायनिक प्रदूषणाचा झालेला उद्रेक.
* हवामान बदल
कार्बन डायऑक्साइड, मिथेन व इतर हरितगृह वायूंमुळे तापमान वाढते.
हिमनग वितळणे, समुद्रसपाटी वाढ, दुष्काळ, अतिवृष्टी हे त्याचे परिणाम.
* जलप्रदूषण आणि जलवायू असंतुलन औद्योगिक, प्लास्टिक व सांडपाणी नद्या व समुद्रात मिसळते.
भूजल पातळी कमी होते, जलस्रोत आटत आहेत. रासायनिक कचरा, प्लास्टिक नद्या/समुद्रात फेकला जातो. केमिकल्स, खतांचा अतीव वापर. केल्याने मृदाप्रदूषण होत आहे. शहरी गोंगाटामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम
दररोज सरासरी १०० हून अधिक प्रजाती नष्ट होतात.त्यामुळे अन्नसाखळी आणि पारिस्थितिक ताळमेळ ढासळतो.
प्लास्टिक व ई-कचऱ्याचा स्फोट झाला आहे. एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक हजारो वर्षे विघटन होत नाही.मोबाईल, संगणक, बॅटऱ्यांमधील विषारी धातू माती व जलस्रोत प्रदूषित करत आहेत.
मानवाच्या मानसिकतेमुळे पृथ्वीवर कचरा वाढत आहे. “अधिक मिळवणे” आणि “सहज टाकून देणे” यामुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले.
– पृथ्वीच्या ऱ्हासाचे परिणाम
– पृथ्वी रक्षणासाठी उपाययोजना
-Every Tree Counts – वृक्षारोपण आणि जंगल संवर्धन
-प्रत्येकाने दरवर्षी कमीतकमी ५ झाडे लावावीत.
-औद्योगिक झोनमध्ये हिरवळ सक्तीने वाढवावी.
-. Every Drop Matters – जलसंधारण व प्रदूषण नियंत्रण
-पावसाचे पाणी साठवणे, सांडपाण्याचे शुद्धीकरण करणे.
-रसायन मुक्त शेतीला प्रोत्साहन.
– Every Action Counts – प्रदूषणविरोधी उपाय
-वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रीक वाहने, सायकल व सार्वजनिक वाहतूक यांना चालना.
-प्लास्टिक बंदी प्रभावी अंमलात आणणे.
-Every Voice Matters – जनजागृती आणि शिक्षण
शाळा, कॉलेज, संस्था आणि समाजात पर्यावरण विषयक प्रशिक्षण आणि स्पर्धा.
-“Green Citizen” मोहीम राबवणे.
सरकारची भूमिका धोरण:
प्रत्यक्षात कृती करणे. झाडे लावणे . कार्बन कमी, छाया व निसर्ग संपत्ती वाढ सायकल/ई-वाहित वापरणे. इंधन बचत, प्रदूषण कमी करणे. प्लास्टिक टाळणे. माती व जलप्रदूषणावर नियंत्रण करणे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे. जलस्रोतांचे जतन करणे. जनजागृती करणे. सामूहिक प्रयत्नास चालना देणे.
पर्यावरण संरक्षणासाठी, व्यक्ती, गट आणि सरकार यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, कारण पर्यावरणाचे रक्षण ही एक सामूहिक जबाबदारी आहे. निरोगी जीवनात आणि पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वामध्ये पर्यावरण महत्त्
पृथ्वी वाचवणे म्हणजे केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही, तर मानवी अस्तित्वाचा प्रश्न आहे.
आपण जर आज सावध झालो, तर उद्याची पिढी जगेल. अन्यथा आपण पुढच्या पिढीसाठी वाळवंट, गरिबी आणि संकट यांचं विश्व तयार करू.
निसर्ग केवळ बघण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी असतो. प्रत्येक कृती, प्रत्येक पाऊल हे पृथ्वीच्या रक्षणासाठी असले पाहिजे.
“पृथ्वीला वाचवा, जीवन सुरक्षित करा, निसर्गाने दिलेली एक संधी जपा!”