जिल्हा परिषद “केसभट वस्ती” शाळेला बेंचचे वितरण
• वातावरण फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम
वेध ताज्या घडामोडींचा: दि.१,अहिल्यानगर: शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील केसभट वस्ती जिल्हा परिषद शाळेत वातावरण फाऊंडेशनच्या वतीने मुलांना बसण्यासाठी बेंच देण्यात आल्या आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे शाळेतील मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
बेंच नसल्यामुळे आमची मुले खाली बसत होती. वातावरण संस्थेने बेंच दिल्याने मुलांना आता खाली बसावे लागणार नाही त्याचप्रमाणे शाळेसाठी फॅन ची व्यवस्था करण्यात आली. संस्थेच्या या उपक्रमामुळे शाळेने वातावरण संस्थेचे संस्थापक भगवान केसभट यांचे आभार व्यक्त केले आहे.
ग्रामीण भागात खेड्यापाड्यात वाड्या वस्तीवर शिक्षण घेणाऱ्या मुलांना शहरी भागातील मुलांसारखे शिक्षक तसेच सोयी सुविधा मिळत नाहीत त्यामुळे मुलांमध्ये सर्व गुण असून देखील त्यांचा पाहिजे तसा विकास होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनाही सर्व सोयींनी युक्त शिक्षण मिळाले पाहिजे असाच आमचा ध्यास असल्याचे वातावरणने सांगितले.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांनाही सर्व सोयी सुविधा युक्त शिक्षण मिळावे. मुलाना शाळेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी खूप मोठ व्हावं. या उद्देशाने वातावरण संस्थेने बेंच आणि फॅन दिल्याचे वातावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान केसभट यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे.