नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्या वतिने महाराष्ट्र विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्या वतिने महाराष्ट्र विधानपरिषदेवर काम करण्याची संधी देण्याची मागणी
वेध ताज्या घडामोडींचा/नवीमुंबई, दि.५:- महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्या वतिने महाराष्ट्र विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आज माथाडी भवन, नवीमुंबई याठिकाणी माथाडी कार्यकर्त्यांच्या बैठकित करण्यात आली असून, याबाबतीत निवेदन सादर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना माथाडी कामगारांचे शिष्टमंडळ पार्टी कार्यालयात भेटणार आहे.
श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्यावतिने महाराष्ट्र विधानपरिषदेवर घेण्याची मागणी करण्यासाठी माथाडी कामगार युनियनच्या माथाडी भवन, नवीमुंबई येथिल सभागृहात बैठक झाली, या बैठकिस युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, युनियनचे इतर पदाधिकारी आणि विविध व्यवसायातील माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेवर असलेले पाच सदस्य महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्य पदावर नेमणुका करताना माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना प्राधान्य द्यावे, अशी एकमुखाने मागणी बैठकित करण्यात आली.
कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी कष्टक-यांची ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी केली, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला, कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे हे कार्य त्यांचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील समर्थपणे पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे व तालुक्यांचे दौरे करुन एक लाख पेक्षा जास्त मराठा उद्योजक करण्याचा विक्रम केला. भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीससाहेब व पक्षाच्या प्रमुखांच्या सूचनेनुसार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अग्रेसर होऊन प्रचार करतात, भाजपाच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये निवडून आणण्याचे उल्लेखनिय कार्य नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.
मराठा क्रांती मोर्चामध्ये सक्रिय सहभाग घेऊन महामंडळाच्या माध्यमातून मराठा युवकांना उद्योजक करण्याचे कार्य करणा-या तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यामध्ये सक्रिय असणा-या आणि कष्टक-यांची व मराठा समाजाची चळवळ समर्थपणे पुढे नेणाऱ्या माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना महाराष्ट्र विधीमंडळामध्ये माथाडी कामगार, मराठा समाज व जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, अशी कळकळीची विनंती माथाडी कामगार कार्यकर्त्यांनी बैठकीत केली, याचा पक्षाने आग्रहाने विचार करावा.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ समजून घेतलेली आहे, ते माथाडी कामगारांना न्याय देत आहेत, पक्षाच्या पदाधिका-यांना देखिल माथाडी कामगार चळवळीचे विशाल स्वरुप ज्ञात आहे, त्यामुळे माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना आतां महाराष्ट्र विधानपरिषदेवर काम करण्याची संधी भारतीय जनता पक्षाकडून दिली जाईल, असा विश्वास देखिल बैठकित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *