“राष्ट्रीय अभियंता” दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन मुख्य अभियंता संतोष शेलार यांना पुरस्काराने सन्मानित तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांना सन्मानित
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१६,अलिबाग: भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी १५सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. रायगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अभियंता दिनी अशाच सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या काही अभियंत्यांचा गौरव करून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी “राष्ट्रीय अभियंता” दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता तृप्ती नाग,राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभाग कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपकार्यकारी अभियंता वसंत टाकळे, कनिष्ठ अभियंता कौशिक राहाटे, पेण रायगडचे कार्यकारी अभियंता नीरज चोरे,सहा.कार्य. अभियंता आकांक्षा मेश्राम, पंकज गोसावी,रविंद्र कदम, शाखा अभियंता रुपेश सिंगासने, अमोल माडकर, शाखा अभियंता रविंद भोये, राहुल विशे, दिव्या काळे, अभिजित झेंडे ,चिपळूण उपविभाग शाखा अभियंता राजेंद्र मराठे, शाखा अभियंता श्रयाम खुनेकर, रत्नागिरी उपविभाग उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी, उपविभाग उपअभियंता खारेपाटण अतुल शिवनीवार, डी.जी.कुमावत,सावंतवाडी उपविभाग कनिष्ठ अभियंता रुपेश कांबळे,मुकेश साळुंखे यांना सन्मानित करण्यात आले.
याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.जगदीश सुखदेवे आणि महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.महेश नामदे , महाड शाखा अभियंता ए. एम.घाडगे, पी. टी.सूर्यवंशी, अक्षय माने, अलिबाग शाखा अभियंता डी. एस. बरबडे, डी.एन.मदने, राजरत्न रणदिवे, बी.ए.वडावराव, पेण शाखा अभियंता धनाजी टिळे, उपअभियंता डी. एम.पाटील, ,महाड उपअभियंता विजय बागुल, श्रीकांत गणगणे, या सर्व कुशल अभियंत्यांना १५ सप्टेंबर अभियंता दिनानिमित्त “उत्कृष्ट अभियंता” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही रायगडकरांसाठी अभिमानास्पद आहे. सर्व स्तरातून या अभियंत्यांचे कौतुक होत आहे.