वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,नवी मुंबई:-सिडको भवन येथे 15 सप्टेंबर 2023 रोजी अभियंता दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सिडको इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभर अभियंता दिन साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमास श्री. अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शांतनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. आर. बी. धायटकर, मुख्य अभियंता (नवी मुंबई व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), सिडको, श्रीमती गीता पिल्लई, महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), श्रीमती शीला करुणाकरन, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, श्री. सुरेश ठाकूर, अध्यक्ष, सिडको इंजिनिअर्स असोसिएशन, श्री. मनोज वाळिंबे, उपाध्यक्ष, सिडको इंजिनिअर्स असोसिएशन, श्री. संजय नरसापूर, सरचिटणीस, सिडको इंजिनिअर्स असोसिएशन यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियंता दिन कार्यक्रमानिमित्त अद्वितीय कामगिरी स्पर्धांतील वैयक्तिक तसेच सांघिक गटांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे या प्रसंगी श्री. रविराज शेट्टी, वॉटरप्रुफिंग एक्सपर्ट ॲन्ड कोअर कमिटी मेंबर, एसीसीई यांनी ‘रेट्रोफिटिंग ॲन्ड वॉटरप्रुफिंग ऑफ स्ट्रक्चर्स’ या विषयावर सादरीकरण केले.