वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,मुंबई: – मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांमध्ये आज सकाळी 6 वाजेपर्यंत 14,05,190 दशलक्ष लिटर म्हणजे 97.07 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा 364 दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत दोन दिवस जोरदार पाऊस पडला. हा पाऊस तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही झाला. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. अजूनही मुंबईत तसेच तलाव क्षेत्रात ढगाळ वातावरण आहे. सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. या पावसाने तलाव जलसाठ्यात वाढ झाली आहे.तलावांमध्ये 364 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असून मुंबईकरांचे पाणी कपातीचे संकटही आणि मुंबईकरांचे पिण्याच्या पाण्याचे टेन्शन दूर झाला आहे. मुंबईत अजूनही ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईत जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झाला. मात्र पूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. दहिहंडी उत्सवाच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. दुस-या दिवशीही चांगला पाऊस झाला. गेल्या महिनाभर पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते.मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात पावसाने उसंत घेतली होती. तलावातील जलसाठ्यात घट झाली होती. ही घट अशीच राहिल्यास १० ते २० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला जाणार होता. मात्र आता तशी वेळ येणार नाही असे पालिकेच्या जलअभियंता विभागाने म्हटले आहे.तलाव – पूर्ण भरण्याची पातळी(मीटरमध्ये) – सद्याची पातळी (मीटरमध्ये)अप्पर वैतरणा – 603.51 – 595.44मोडकसागर – 163.15 – 143.26तानसा – 128. 63 – 118.87मध्य वैतरणा – 285.00 – 220.00भातसा – 242.07 – 104.90विहार – 80.12 – 83.92तुळशी – 139.17 – 131.07- सात तलावांत 14,05,190 दशलक्ष लिटर- पाणीसाठा – 97.07 टक्के- जलसाठा 364 दिवस म्हणजे 12 सप्टेंबर 2024 पुरणार – विहार आणि तुळशी तलाव सध्या 100 टक्के भरलेले आहेत – मोडक सागर – 99.52 टक्के – तानसा – 98.69 टक्के- भातसा- 98.20 टक्के- मध्य वैतरणा – 97.68 टक्के- अप्पर वैतरणा तलाव – 90.19 टक्के भरलेला आहे
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, धरण 97.7 %भरली
