उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मुख्यमंत्री शिंदेंची बैठक

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,उल्हासनगर:उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मुख्यमंत्री शिंदें यांनी  बैठक घेवून गतीने काम करण्याचा सूचना दिल्या आहेत. शहरातील काही भागांना भेडसावणाऱ्या पाणी समस्यांविषयी बुधवारी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली. एमआयडीसीच्या माध्यमांतून उल्हासनगरवासियांना मुबलक पाणी पुरवठा करणे आणि उल्हासनगर शहरासाठी स्वतंत्र पाण्याचे स्रोत उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत उल्हासनगर महापालिकेतर्फे सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यानुसार गतीने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली;
उल्हासनगर शहरातील सर्व पाचही कॅम्पमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी, महावितरण आणि उल्हासनगर महापालिका प्रशासन यांची एकत्रितरित्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात यावी. याबाबत उद्योगमंत्री महोदयांनी आदेश दिले.
 उल्हासनगरमधील नागरिकांना एमआयडीसी प्राधिकरणाने अधिकचा पाणीपुरवठा करावा. हा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महावितरणने शहरात वारंवार विजेचा पुरवठा खंडित करू नये.
अमृत – २ योजनेच्या माध्यमातून उल्हासनगर शहरात स्वतःचे पाण्याचे स्रोत उभारण्यात येणार आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाकडून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. पाणी सुरळीत मिळावे यासाठी शहरात भूमिगत विजेची केबल टाकण्यात आली असून यासाठी महापालिकेला सुमारे २५ लाख रुपये इतके भू – भाडे दयावे लागणार होते. हे पूर्ण माफ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
महापालिकेला पाणी पुरवठ्याचा स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासाठी ७.५ हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने महापालिकेला जमिनीचे हस्तांतर करावे. उल्हासनगर महापालिकेला ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून वाढीव ५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया त्वरित गतीने राबविण्यात यावी. पूर्ण दबाने पाणी सोडण्यात यावे. शहरात जलकुंभ, भूमिगत टाक्यांची उभारणी कऱण्यात यावी
या बैठकीला आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार कुमार आयलानी, उल्हानगर उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक कलवंतसिंह सोहोता यांच्यासह उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासमवेत संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *