वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,नवीमुंबई:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे प्रमुख नेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वंडर्सपार्क येथे भरपावसात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी नाईक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले, याप्रसंगी आयोजक मा.नगरसेवक तथा सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे,मा.नगरसेवक श्री सुरेश शेट्टी,उद्द्योजक दिनेशभाई पासोरिया,अतिरिक्त आयुक्त श्री संजय निकम, सुनिल सैनी,अंकुश हाडवळे,गणेश मोरे,अशोक भांडवलकर,गिरीश देशमुख, राजीव अगरवाल,अनिल लोखंडे,अतुल पांडे,आप्पा इंदोरे,प्रविण जैन,महादेव गुर्जर,अनिल गुप्ता,अशोकशेठ हिंगे,सौ संध्या वारिंगे व सहकारी,अजित कौर धिल्लोन व सहकारी व बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी श्री संदीप नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज सकाळी सात वाजता एवढ्या पावसात देखील मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले व रविंद्र इथापे यांचे कौतुक करतो.आज सर्व नवी मुंबई शहरात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन त्याची सुरुवात या वंडर्सपार्क पासुन होतेय. आज ज्या पध्दतीने उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात विकासाची कामे करतात ते पाहिल्यावर अभिमान वाटतो. तसेच श्री रविंद्र इथापे यांनीदेखील महिला व नागरिकांचे आभार मानले व श्री संदीपजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील आम्ही नमंमनपामध्ये एकत्र काम केले असुन त्यांनी स्थायी समिती सभापती ते आमदार अशा प्रवासात नवी मुंबईला दिशा देण्याचे काम केले असुन, निश्चित स्वरूपात ते भारतीय जनता पक्षाचा झेंडा येत्या मनपाच्या निवडणूकीत नवी मुंबई पालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असे श्री रविंद्र इथापे यांनी सांगितले. याप्रसंगी विविध फळझाडांची १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.