पाणी समस्या सुटली नाही तर रोज पालिकेत येऊन प्रत्येक दिवशी मडका भेट देईल- नगरसेवक सुरज पाटील यांचा अभियंत्यांना इशारा

●नेरूळ यथील पाणी प्रश्नी केला पाणी चोरांचा जाहीर निषेध

●अतिरिक्त शहर अभियंत्यांना मजकूर लिखित मडका भेट

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१८,नवीमुंबई: नवी मुंबईतील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.यामुळे नागरिकांना तीन तीन दिवस पाणी पुरवठा होत नाही, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आज आक्रमक होत अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांची भेट घेत आपले आक्रमक म्हणणे मांडले .तसेच त्याना मातीच्या मडक्याची भेट दिली.त्याच बरोबर नवीमुंबईकरांचे हक्काचे पाणी इतर शहरांना वलती करणे त्वरित बंद करा अशी आग्रही मागणी केली.

नवी मुंबई पालिकेचे स्वतःचे मोरबे धरण आहे.मागील दीड दोन वर्षापुर्वी शहरतील नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत होता.परंतु कालांतराने शहारत मोठ्या प्रमाणात पाण्याबाबत प्रशासनाकडुन बेफिकरी,ईतर शहरांना पाणी वळते करने असे प्रकार वाढले. त्या प्रमाणे नेरूळ विभाग कार्यालय क्षेत्रातील कुकशेत, सारसोळे,नेरुळ कॉलनी परिसरात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पाण्या विषयी समस्या निर्माण झाली आहे.

आजच्या परिस्थिती मध्ये नेरूळ परिसरात पाणी पुरवठा न होणे, अवेळी पाणी पुरवठा होणे,कमी दाबाने येणे,गढूळ पाणी नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येणारे पाणी देखील कधीही येत असल्याने अनियमित पाणी पुरवठा समस्या मध्ये वाढ झाली आहे. तसेच पाणी न येण्या मागील कारण हे शट डाऊनचे पाणी पुरवठा कर्मचारी देत आहेत. यामुळे नागरिकात तीव्र नाराजी असल्याचे असल्याचे माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी सांगितले

“इतर शहरांना देत असलेले पाणी बंद करा…”
नवी मुंबई मनपाच्या मोरबे धरणातून इतर शहरांना पाणी पुरवठा होत आहे. तो तातडीने बंद करावा. तसेच बारवी धरणा कडून १६० एमएलडी इतके पाणी पालिकेला मिळणार होते.परंतु त्यातील फक्त ८० एमएलडी इतका पाणी दिले जाते असे म्हणत असताना प्रत्यक्षात ४० ते ४५ एमएलडी इतकाच पाणी पुरवठा होत आहे.

नवीमुंबईकरांच्या हक्काचे पाणी ईतर शहरांना देवुन अधिकारी ह्या पाणी चोरीला साथ देत आहेत का ?
असा  प्रश्न उपस्थित केला व या पाणी चोरांचा निषेध केला.

पाणी समस्या भयानक गंभीर झाली आहे.यावर तोडगा काढावा, पाणी वलती करणे व चोरी बंद व्हावी. म्हणून आज अतिरिक्त शहर अभियंत्यांना मडका भेट देऊन त्यावर ” आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या. पाणी चोरांचा जाहीर निषेध” असे लिहिले आहे. जर पाणी समस्या सुटली नाही तर रोज पालिकेत येऊन प्रत्येक दिवशी मडका व त्यावरील मजकुराची भेट दिली जाईल. असे माजी नगरसेवक सूरज बाळाराम पाटील यांनी अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांना इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *