जागृती फाऊंडेशनच्या वतीने महाळुंगी येथे वृक्ष रोपण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२०,पनवेल:
पर्यावरणाचा होणार ऱ्हास , वाढते शहरीकरण,नवनवीन प्रकल्प यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोड होते ,प्रकल देखील हवेत आणि पर्यावरणाचा समतोल हि राखला जावा याकरिता आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जागृती फाऊंडेशन च्या वतीने पनवेल तालुकत्यातील महाळुंगी गावात वृक्ष रोपण करण्यात आले

संस्थेच्या वतीने या वर्षी ५०० झाडे लावण्याचा संकल्प केला होता त्यात जवळपास यश आले असल्याचे जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले .

  • शहराचा , राज्याचा देशाचा विकास हवा या करिता नवं नवे प्रकल्प आपल्या भागात यावेत असे प्रत्येकाला वाटते मात्र हे प्रकल्प येताना मोट्या प्रमाणत वृक्ष तोड होते त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे ,गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी भूस्सलखन होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत पर्यावरण तज्ज्ञांच्या मते वृक्ष लागवड ,जतन केली वृक्ष लागवड केली तर अशा घटनांना आळा घालू शकतो. निसर्ग ठीकवणे त्याचा समतोल राखणे हे मानवाच्या हातात आहे ,म्हणूनच जागृती फाऊंडेशन च्या वतीने या वर्षी किमान ५०० झाडे लावण्याचा संकल्प केला होता त्यात संस्थेला बहुतांशी यश आले आहे या करिता जागृती फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी सदस्य प्रामाणिक पणे काम करीत आहे .
    नुकताच पनवेल तालुक्यातील महाळुंगी गावात आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी जागृती फाऊंडेशन चे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे ,उपाध्यक्ष संदेश पाटील ,महिला आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष ज्योत्सना भोईर ,विष्णू भोईर,संतोष गायकवाड ,गौतम पाटेकर , अंगण वाडी सेविका शोभा संतोष बोलाडे ,ग्रामपंचायत सदस्य मनोहर अरिवले ,नीलम अरिवले,भगवानमहाराज बोलाडे ,हेमंत पाटील ,संजय गोंधळी ,स्वप्नील भागिवत,अनुसया बेडेकर ,भारती भागिवत, कल्पना भागिवत ,भारती पवार ,रंजना पाटील ,रतन घागस ,परेश घागस,दशरथ पाटील आदी जण उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *