सामाजिक कार्यकर्ते राजेश केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१८,पनवेल: नेहमीच सामाजिक कार्यात  अग्रेसर असलेले शेतकरी कामगार पक्षाचे राजेश केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला.  यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी शुभेच्छा देवून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले.

सामाजिक कार्याची आवड सर्व सामान्य नागरिकांना आडल्या नडलेल्यांना मदत करण्याची आकांक्षा यामुळे पनवेल मध्ये ओळख निर्माण केलेले एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून राजेश केणी यांची समाजात ओळख आहे. यावेळी विविध सामाजिक उप्रकम राबवण्यात आले सर्वसामान्य नागरिकांना अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासते. नागरिकांना या अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून आभा हेल्थ आयडी, आधार कार्ड मटंडन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच घरकाम करणाऱ्या महिलांसाठी निराधार आणि विधवा महिलांसाठी पोस्ट ऑफिस योजना आणि त्याविषयी लागणारी कागदपत्रे तसेच विविध कागदपत्रे काढून देण्यात आली प्रत्येक व्यक्तीने निरोगी आयुष्य जगावे कामाच्या धावपळीत माणूस आरोग्य्याकडे दुर्लक्ष करतो यासाठी ई.सी.जी . चेकअप, दंत चिकित्सा, डोळे तपासणी आणि चष्मे वाटप, रक्त तपासणी तसेच जनरल चेकअप इत्यादी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल परिसरातील असंख्य नागरिकांनी कागदपत्रेविषयक आणी आरोग्यविषयक शिबिराचा लाभ घेतल्याचे राजेश केणी यांनी सांगितले आहे.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेलकर साहेब ,पोलिस कूवर साहेब, पोलिस सूर्यकांत देसाई साहेब, सुभाष भोपी,शेखर शेळके, वामन शेळके, नामदेव फडके,बाळा फडके,सुधीर फडके, बबन फडके, गजानन पाटील, आर्किटेक अतुल जी म्हात्रे, गणेश काळूराम केणी, नरेश केणी, किसन भुजंग सरपंच,स्वप्निल भोजन पंचायत समिती सदस्य, पांडुरंग केनी,सुभाष केनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *