● वाढीव बिलामुळे नागरिक झालेत त्रस्त
●नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना महावितरण कार्यालयातून उडवाउडवीची उत्तर,
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७,पनवेल: वाढीव वीज बिलामुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहे 1bhk घर असेल तर 2दोन हजार ते 3 हजारांपर्यंत वाढीव बिल येत आहे. व्हॅलीशिल्प खारघर मध्ये 4 ते 6 हजारापर्यंत वाढीव बिल आले आहे महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एखाद्या रहिवाशांनी वाढीव बिल का येत आहे असा प्रश्न विचारला तर गर्मी खूप आहे तुम्ही जास्त वापर केला असेल असे उत्तर येत आहे.
वेळेवर लाईट बिल भरले नाही तर काहीही न कळवता महाविरणचे कर्मचारी येऊन कनेक्शन कट करतात. मीटर रीडिंगसाठी महावितरण ने एजन्सी नेमलेल्या आहेत. या एजन्सीकडून प्रॉपर रिडींग घेतले जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. चुकीचे रिडींग टाकल्याने जास्त वीजबिल येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 500रुपये वीज बिल येणाऱ्या ग्राहकाला 2 हजार रुपये बिल येत आहे. सर्वसामान्य नागरिक कुठून भरेल एवढे बिल आधीच एवढी महागाई त्यात जास्तीचे वीजबिल त्यामुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत.