-बालमटाकळीत महिला हितगुज मेळाव्याचे आयोजन,
-सावता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मयुर वैद्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उचल फाऊंडेशन च्या अनाथ आश्रमांच्या मुलांना 50 हजारांचा धनादेश,,
वेध ताज्या घडामोडींचा/पांडूरंग निंबाळकर, दि.१७,अहमदनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रमुख आकर्षन प्रसिद्ध मराठी शिनेअभिनेत्री अलका कुबल यांचा महिला हितगुंज मेळावा ठेवण्यात आला यावेळी महिला बरोबर हितगुज साधताना सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी म्हटले की ४०वर्ष फिल्म इंडस्ट्रीज मध्ये प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे मी टिकून आहे. सांध्वी शितल देशमुख , पुनम राऊत , अस्मीता मराठे , मोनीका छाजेड यांचा अलाका कुबल यांच्या हस्ते गुण ,गौरव ,व महिलांना आदर्श पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये उचल फाउंडेशन च्या अनाथ मुलांसाठी 50 हजाराचा आर्थिक धनादेश देण्यात आला या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध व्याख्याती कवी लेखीका झेप फांऊडेशन सौ निशाताई आजिक्य देवमारे फुले यांच व्याख्यान झाले त्यांनी बोलताना संगीतले जेव्हा तुम्ही स्व :हा बदलत नाही तो पर्यत मुले बदलनार नाहीत असे त्यांनी बोलतांना सांगीतले या कार्यक्रम प्रसंगी माजीसरपंच मंगल ताई वैदय, मंदाकिनी वैदय ,जैशाली वैद्य ,डॉ मनीषा लढ्ढा ,उपसरपंच तुषार वैद्य, रंगाभाऊ वैद्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजापुरे, दिनकर वैद्य, सरपंच कौशल्या कवडे ,भागीरथी शिंदे ,भारती विधाते, रेणुका वैद्य, उचल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन खेडकर सर्व परिसर व मोठया प्रमाणात महीला वर्ग उपस्तीत होता.