२७४०० रुपये पगारवाढ, १० वर्षात तब्बल ६४८०० रुपये पगारवाढ !
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७ नवीमुंबई: कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना हि आपल्या वाटचालीतील मैलाचे दगड पार करत आहे. असाच एक मैलाचा दगड आजच्या पगारवाढीच्या करारनाम्यानुसार पार करण्यात आला मे.आरकेमा केमिकल्स नेरूळ येथील कामगारांसाठी २७४०० रुपये पगारवाढीचा करार आज करण्यात आला. दहा वर्षापूर्वी या कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्विकारले. मागील दहा वर्षात तीन करारानुसार कामगारांच्या तब्बल ६४८०० रुपये पगारात वाढ करण्यात संघटना यशस्वी झाली आहे. दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी खारघर येथील हॉटेल थ्रीस्टार येथे झालेल्या करारनाम्यानुसार पगारवाढीसोबतच एक पगार बोनस, एक पगार इन्सेन्टिव्ह दरवर्षी तसेच पाच लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.पगारवाढीच्या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कामगारांनी संघटनेचे आभार मानले व कामगारांसाठी खऱ्या अर्थाने काम करणारी संघटना अशी भावना व्यक्त केली. या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष श्री. पि. के. रमण, सरचिटणीस श्री. वैभव पाटील व्यवस्थापना तर्फे श्री. विवेक जगताप ( MD ), श्री. विपुल सावंत ( HR Head ) कामगार प्रतिनिधी श्री. नंदकुमार पांचाळ, अमसिद घंटे , सुधाकर किलचे, प्रवीण सावंत, बळीराम कोळी आदि उपस्थित होते.