वेध ताज्या घडामोडींचा/१६,बेलापूर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बेलापूर येथील वार्ड नंबर १०३ या विभागात ध्वज रोहन आणि वृक्षलागवड करण्यात आले.
समासेवक अशोक नरबागे आणि नवी मुंबई महानगरपालिका मा. नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी आपल्या प्रभागात स्वातंत्र्य दिनी ठिकठिकाणी ध्वजारोहण करून पर्यावरण संरक्षणासाठी वार्डातील विविध ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून परिसरातील पर्यावरण संरक्षनासाठी महत्वाची कामगिरी केली आहे.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.