वेध ताज्या घडामोडींचा/दि.१६,पेण: हमरापूर येथील अक्षर विद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे, जगविण्याचे व जगविलेल्या झाडांचे वाढदिवसही साजरे करण्याचे संस्कार केले जातात. पाठयपुस्तकांच्या बाहेरचे शिक्षण या निसर्गरम्य शाळेत शिकायला मिळते. वृक्षसंवर्धनाचा उपक्रम दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी अक्षर विद्यालयातील वृक्षांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी डी. वाय. एसपी. शिवाजी फडतरे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सोमनाथ घार्गे पूढे म्हणाले काही ठिकाणी त्याच खडयात दरवर्षी नवीन झाड लावतात. पण ते जगवले पाहीजे. या शाळेच्या परीसरातील वाढलेली झाडे पाहून त्याचा प्रत्यय येतो. शाळेचा हा उपक्रम दिशादर्शक आहे. तो प्रत्येक गावागावामध्ये राबवायला हवा ग्रामपंचायतीने हा उपक्रम पूढे न्यायला हवा. नैसर्गिक प्राणवायू मिळण्यासाठी झाड लावल्या शिवाय पर्याय नाहीआज लावलेली झाडे ही पुढच्या पिढीसाठी वरदान आहेत.

या प्रसंगी इयता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रथम क्रमांक मन सचिन पाटील. ( ७९.४०% ), व्दितीय क्रमांक सिध्दी सुरेश घरत (७६.६०%) क्रमांक यश समिर ठाकूर. (७०.००% ) यांचा घार्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच राकेश दाबाडे, माजीसरपंच प्रदिप म्हात्रे. पोलीस अधि गोळ. प्रभाकर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय यांनी केले तर पाहूण्यांचे स्वागत मुख्याध्यापक अरुण डोंगरदिवे यांनी केले.