●समाज परिवर्तनकार वसंत हंकारे सर यांनी बाप समजावून घेताना या व्याख्यानमालेत अश्रूंना वाट मोकळी करून दिली ,
●शालेय जीवनात जीवन जगताना मूर्ख लोकांवर विश्वास ठेवून मुलींनी आपले जीवन बरबाद करू नये
वेध ताज्या घडामोडींचा/ पांडूरंग निंबाळकर, दि.१६
अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भगवान विद्यालयामध्ये १४ ऑगस्ट रोजी व्याख्यान ठेवण्यात आले होते, आपल्या जीवनात बाप काय आहे , हे पहिले मुला-मुलींनी समजावून घ्या , जन्म दिलेल्या आई-वडिलांना डावलून मुले मुली शिक्षणाच्या नावाखाली आई-वडिलांना धोका देऊन मूर्ख लोकांवर भरोसा , विश्वास ठेवून आपण प्रेमाचे खेळ खेळतात , हे जीवनासाठी कितपत चांगले आहे , मुलीचे लग्न करण्यासाठी बाप काय करतो , मुलीने शालेय जीवनात बापाची मान खाली जाणार नाही असे कृत्य करू नये आपल्यासाठी बाप काय आहे हे पहिले समजावून घेणे गरजेचे असल्याचे युवा व्याख्याते व समाज परिवर्तनकार वसंत हंकारे सर यांनी बाप समजावून घेताना या व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांना बाप समजावून सांगताना अक्षरशः सर्वांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती , यावेळी माता भगिनी व पालक शिक्षक स्टाफ उपस्थित होते,