कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानाना आजी माजी सैनिकांकडून मानवंदना ,

कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानाना आजी माजी सैनिकांकडून मानवंदना ,

●भारत मातेची सेवा करणाऱ्या कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मारकासाठी लोकवर्गणी करावी ही खेदाची बाब ,

वेध ताज्या घडामोडींचा/पांडुरंग निंबाळकर,दि.१६,
अहमदनगर: जिल्हयाच्या व बीड जिल्ह्याच्या सिमेवरील असलेल्या शेवगांव तालुक्यातील सुकळी येथील तरुण युवक वसंत पांडूरंग गरड हा जवान भारतमातेची व देशाची सेवा करतांना कारागिलच्या युध्दात शहीद झाला , गेल्या 24 वर्षापासुन त्या शहीद जवानाचे स्मारक आजवर झाले नसल्याने गावकरी व शेवगाव तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी लोकवर्गणी करुन शहीदाचे स्मारक हे 24 वर्षानंतर केले , देश सेवा करताना शाहीद झालेल्या जवानाच्या स्मारकासाठी लोकवर्गणी करून स्मारक उभारण्याची वेळ यावी ही खेदाची बाब आहे शासन स्मारकासाठी काही करू शकत नाही का असा सवाल नागरिक करीत आहेत , शहीद जवानाच्या स्मृती स्थळावर शेवगांव तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मानवंदना दिली ,संतोष मासालकर , आंबादास कणके , दिलीप गायकवाड , बाबासाहेब अंधारे , गोरख कोह्रक , उत्तम गालफाडे , विशाल तुरमाटे, सरपंच माया भवर , लहुराव भवर पत्रकार जयप्रकाश बागडे, पत्रकार पांडुरंग निंबाळकर ,सैनिक , ग्रामस्थ उपस्थीत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *