स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान व जिमसीकेस प्राणीक हीलिंग शिबिर

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४, नवीमुंबई: खारघर युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सदर संस्थेच्या वतीने १३ वे रक्तदान शिबिर या वर्षी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबिरात माहेश्वरी प्रगती मंडळ, खारघर यांचे योगदान लाभणार आहे. रक्तदान शिबिराबरोबरच जिमसीकेस प्राणीक हीलिंग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. खारघर मधील तरुण वर्गाला तसेच सर्व रहिवाशांना विनंती की देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्व देशभक्त नागरिकांनी रक्तदान करत साजरा करूया.
जिमसीकेस प्राणीक हीलिंग

     किरण पाटील  व नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील यांच्या पुढाकाराने आपल्या विभागात एक आगळे वेगळे मोफत आरोग्य शिबीर म्हणजेच कुठलेही औषध न घेता, शरीराला स्पर्श न करता, प्राण शक्तीचा उपयोग करुन आजारातून बरे होता येते. हे कसे व काय? हे जाणुन घेण्यासाठी व अनुभव घेण्याकरिता खाली दिलेल्या ठिकाणी एकत्र येत आहोत. आपली आपल्या परिवारा सहीत प्रार्थनीय आहे.
शिबिर मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सेक्टर 19 खारघर या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत योजनेत आलेले आहे. युवाप्रेरणा सामाजिक संस्था खारघर यांच्यावतीने खारघर मधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने वरील दोन्ही शिबिरात सहभाग नोंदवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *