मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे

ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड मध्ये मेरी मिट्टी मेरा देश अभियान मोठ्या उत्साहात साजरे, कार्यक्रमाला तहसीलदारांची उपस्थिती 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,पनवेल: ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड  मध्ये व राज्य शासनाच्या आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या समोरोपीय उपक्रमा अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान मोठ्या उत्साहात आज साजरा  करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शिलाफलकाचे उद्घाटन माननीय श्री पंढरीनाथ गाढे निवृत्त पोलीस अधिकारी  यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर ध्वजारोहण मेजर इंडियन आर्मी  श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीता नंतर स्वतंत्र सैनिक वीरांना वंदन करण्यात आले, त्यानंतर पंचप्राण शपथ घेण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे भाषण झाले,  कसलखंड गावातील गणपती घाटासमोर तलावाच्या बाजूला कमलाकर घरत कृषी सम्राट पुरस्कृत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

कार्यक्रमाला उपस्थित  तहसीलदार सर्कल आण्णा उपस्थित मंडल अधिकारी सानप साहेब, ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड प्रशासक कांबळे साहेब, सचिन पवार साहेब तलाठी, ग्रामसेवक लवटे साहेब, सौ माधुरी ताई अनिल पाटील माजी सरपंच, प्रभारी सरपंच अनिल पाटील, माजी उपसरपंच महादेव पाटील, ह भ प संभाजी महाराज, किसन गाडे, तसेच महिला बचत गट महिला वर्ग, ग्रामस्थ मंडळ कसलखंड व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *