नगरसेवक रविंद्र इथापे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा, कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: नगरसेवक तथा सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे यांचा वाढदिवस आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर,रूग्णांना फळे वाटप,जेष्ठ नागरिकांचा सन्मान, तसेच जेष्ठ नागरिकांना व रहिवाशांना छत्री तसेच राष्ट्रध्वज वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन लोकनेते तथा आमदार श्री गणेशजी नाईकसाहेब,मा.खासदार श्री संजीव नाईक,मा.आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.संदीप नाईक,मा.महापौर जयवंत सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरूळ येथे करण्यात आले होते.
तसेच रविंद्र इथापे यांच्या प्रयत्नातून १)मदर तेरेसा उद्द्यानात पदपथाची सुधारणा व काँक्रिटीकरण. २) स्व.आर आर पाटील उद्द्यानात रंगरंगोटी व इतर दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ देखील याप्रसंगी श्रीफळ वाढवून करण्यात आला.

याप्रसंगी मा.नगरसेवक जयाजी नाथ,अशोक गुरखे,सुरेश शेट्टी,शिल्पा कांबळी,सौ.सुरेखा इथापे,सुनिल पाटील,सुरज पाटील,प्रदीप गवस,गणेश म्हात्रे,रणजित नाईक,ब्रिगेडियर धरमप्रकाश,मेजर संतोष सिंग,उद्द्योजक दिनेशभाई पासोरिया,उद्द्योजक श्री उल्हासशेठ भोर,एसीपी प्रकाश निलेवाड,उपायुक्त बाबासाहेब राजळे,उत्कर्ष जेष्ठ महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती फडके,वाळवेकर व सर्व सदस्य,जेष्ठ नागरिक संघाचे चेअरमन श्री अरविंद वाळवेकर,उपाध्यक्ष श्री प्रभाकर गुमास्ते,श्री दिघे व सर्व सदस्य भिमाशंकरचे चेअरमन रमेश पवार व सर्व संचालक,भिमाशंकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री म.म.नायकोडी,श्री अशोकशेठ हिंगे,लक्ष्मण कोरडे व सर्व सदस्य,हांडेदेशमुख, वाॅर्डमधील सर्वच सोसायटीचे चेअरमन व सदस्य उपस्थित होते. यावेळेस लोकनेते श्री गणेशजी नाईक यांनी रविंद्र इथापे यांच्या कामकाजाचे कौतुक करताना रविंद्र इथापे यांनी करोना कालखंडात झोकुन घेतले व जे जे त्यावेळेस गरजेचे आहे ती कामे या सर्व परिसरात त्यांनी केली असल्याने जनता त्यांना कधी विसरणार नाही. सकाळी माॅर्निग पासुन तर संध्याकाळपर्यंत लोकांची नागरी व सामाजिक कामे करण्याचे काम श्री रविंद्र इथापे करतात म्हणुनच आज दिवसभर व या कार्यक्रमास देखील हा हाॅल भरगच्च भरला आहे. हिच त्यांच्या कामाची पोचपावती आहे असे श्री गणेशजी नाईक यांनी रविंद्र इथापे यांच्या कामकाजाचे कौतुक करताना सांगितले. याप्रसंगी रविंद्र इथापे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रविंद्र हांडे,वाॅर्डअध्यक्ष श्री रवि डेरे,महिला वाॅर्डअध्यक्ष सौ.योजना नलावडे,युवा नेते राहुल इथापे यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.