वेध ताज्या घडामोडींचा/दि.१३,पनवेल : पनवेल आरटीओ कार्यालयात दलालांचा सुळसुळाट सुरू आहे. आरटीओ ची सर्व कामे दलालांमार्फत केली जात आहे. आरटीओ कार्यालयाला दलालांचा कायमचा वेढा पडलेला असतो. दलालांचे आधिकाऱ्यांसोबत लागेबांदे असल्याचे यातून लक्षात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या ठिकाणी थाराच मिळत नाही. एजंट शिवाय काम होत नसल्याने वाहन परवानासह इतर कागदपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत. प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून डोळेझाक केली जात आहे. परिणामी नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. तरी या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.