बालमटाकळी येथील भाचा असिस्टंट कमांडट पदी निवड झाल्याने नागरी सत्काराचे आयोजन
पांडुरंग निंबाळकर/वेध ताज्या घडामोडींचा,दि.१२,अहमदनगर:
शेवगाव तालुक्यातील अधोडी या छोट्याश्या गावातील अंकुश पोटभरे सर यांचे चिरंजिव व बालमटाकळी येथील रायभानदादा शिंदे यांचे नातु प्रशांत पोटभरे यांची युपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत असिस्टंट कमांडटपदी निवड झाल्याने त्यांचा बालमटाकळी येथे मामाच्या गावी नागरी सत्काराचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात सन्मान करण्यात आला ,
असिस्टंट कमाडंट पदी प्रशांत पोटभरे यांची निवड झाल्यामुळे बालंबिकादेवी मंदिरात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साध्वी शितलताई देशमुख या होत्या ,
अधोडी गावचे मुळ रहिवासी तथा लाडजळगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अंकुशराव साहेबराव पोटभरे व अर्चना अंकुशराव पोटभरे यांचा मुलगा प्रशांत याने युपीएससी परीक्षेत यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. प्रशांतचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण बोधेगाव येथील मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. पाचवी शिवाजी हायस्कूल बोधेगाव येथे तर सहावी ते बारावीचे शिक्षण नवोदय विद्यालयातून झाले. बारावीनंतर त्याने सांगलीतील वालचंद काॅलेजमधून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. गुणवत्तेच्या जोरावर टाटा ग्रुपमध्ये सहा लाख रुपये पॅकेज असलेली नोकरीही मिळवली.परंतू, भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न प्रशांतला स्वस्थ बसू देत नव्हते. दिड वर्षातच इंजिनीअरींगच्या नोकरीला रामराम ठोकून त्याने २०२१ मध्ये थेट दिल्ली गाठली. त्याठिकाणी एक वर्ष युपीएससीची तयारी केली. तेथून माघारी पुण्यात येऊन अभ्यास केला. कठोर मेहनत व इच्छाशक्तीच्या बळावर प्रशांतने वर्षभरातच २०२२ मध्ये लेखी व शारीरिक चाचणी आणि जुलै २०२३ मध्ये तोंडी परीक्षा देत यशाला गवसणी घातली. त्यास असिस्टंट कमांडंट अजय कल्याण पोटभरे, मामा गणेश रायभान शिंदे, वडील अंकुशराव पोटभरे व मित्रांचे विशेष मार्गदर्शन, सहकार्य लाभले.
यावेळी साध्वी सितलताई देशमुख ,उपसरपंच तुषार वैद्य , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे , ज्ञानेश्वर चे माजी संचालक मोहनराव देशमुख , शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मयुर वैद्य , रायभानदादा शिंदे , अंकुश पोटभरे , सेवा संस्थेचे चेअरमन माणिकआप्पा शिंदे , ज्ञानदीप अर्बन बँकेचे चेअरमन महेंद्र गरुड ,ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत पा . गरड , सेवा संस्थेचे संचालक रोहिदासजी भोंगळे , गणेश शिंदे , योगेशदोडके ,काका भाकरे तंटामुक्तीचे अध्यक्ष कासममामा शेख , सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरीश्चंद्र घाडगे , बाबासाहेब देशमुख सर , परशू गरड ,आशोक खिळे , संदीप देशमुख , आरुण बापु शिंदे ,भगवान वैद्य ,विष्णू घाडगे , बाबा तारक , दौड सर, देवढे सर, प्रशांत देशमुख , पोटभरे सर ,माणिक देशमुख , ,आशोक पांढरपोटे, विष्णू वाघुंबरे , बाबा सोनवणे पत्रकार जयप्रकाश बागडे , पत्रकार पांडुरंग निंबाळकर आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .