बालमटाकळीत श्री भगवान विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा..
वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,अहिल्यानगर प्रतिनिधी– पांडुरंग निंबाळकर
शेवगाव तालुक्यातील श्री भगवान विद्यालय बालमटाकळी येथे दि.६डिसेंबर २०२४रोजी महापरिनिर्वाणदिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.प्राचार्य श्री उत्तम रक्टे यांचे हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.या प्रसंगी प्रा.राजेंद्र काटे,प्रा रामदास जवरे प्राचार्य उत्तम रक्टे यांनी महामानव भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर याचे जिवनावर मोलाचे मार्गदर्शन केले .विद्यालयातील विद्यार्थीनी प्रतिक्षा सुर्यवंशी ,परिशा बोरूडे यांनी डाॅ बाबासाहेबांच्या जिवनावर सुंदर गाणी म्हटली विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .या प्रसंगी वाचनाचे महत्व व भारतरत्न डाॅ बाबासाहेबांचे अनुभव मुलांनी ऐकले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजेंद्र मराठे यांनी केले तर छायाचित्रण प्रसाद कुलट व विशाल जोशी यांनी केले .या प्रसंगी पर्यवेक्षक लक्ष्मण गागरे, प्रमोद जोशी ,भास्कर आंधाळे,राजकुमार तोतरे,धोंडिराम भोसले ,बबन घुले,शंकर शिंदे, गणेश नजन,श्रध्दा नजन,अंकुश ढाकणे,कल्याण मापारे,रामेश्वर वडघणे,पांडुरग शिंदेआदीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते,