लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती व शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस केदारेश्वरवर साजरा
वेध ताज्या घडामोडींचा/दि.12,अहिल्यानगर प्रतिनिधी /पांडुरंग निंबाळकर
संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे ,केदारेश्वर सहकारी साखर कारखाना सुमननगर बोधेगाव येथे लोकनेते ,स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली तर शेतकऱ्यांचे कैवारी , जाणता राजा शरदचंद्र पवार यांचा 84 वा वाढदिवस कारखाना कार्यशाळावर साजरा करण्यात आला ,
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे यांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या उजाळा देऊन म्हटले की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे अँड प्रताप ढाकणे यांच्यावर अतोनात प्रेम होते , महाराष्ट्रात मुंडे साहेबांनी जे स्थान निर्माण केले ते अनमोल असल्याचे ते म्हणाले ,
यावेळी संचालक त्रिंबक दादा चेमटे , प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गरजे , विजयकुमार सवणे कन्सलंट पुणे , त्रिंबक करोडकर कन्सलंट पुणे , प्रशासकीय अधिकारी पोपट केदार , शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे , चीफ इंजिनियर प्रवीण काळोसे , चीफ केमिस्ट रामनाथ पालवे , प्रोसेस हेड चंद्रकांत शिंदे , चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरट , परचेस ऑफिसर तुकाराम वारे , सुरक्षा अधिकारी राजाराम केसभट , यांचे सह अधिकारी व कामगार उपस्थित होते.