सरपंच अंबादास ढाकणे यांची ओरिसा मधे अभ्यास दौऱ्यासाठी निवड ,
जिल्हा परिषदेच्या ” गाव माझा सुंदर ” या योजनेत तालुक्यात लाडजळगाव ग्रामपंचायतचा प्रथम क्रमांक
वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,अहिल्यानगर प्रतिनिधी, पांडुरंग निंबाळकर :
राष्ट्रीय स्वराज योजने अभियानांतर्गत 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे नियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांची ओरीसा राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद व यशदा निवड करण्यात आली असून सरपंच ढाकणे यांचे जिल्हाभरातून अभिनंदन केल्या जात आहे ,आर आर आबा ” गाव माझे सुंदर ” या स्पर्धेमध्ये शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव व लाडजळगाव या दोन गावांनी सहभाग घेतला होता , सदरील स्पर्धेमध्ये लाडजळगाव मधील शाळा परिसर , गाव परिसर ग्रामपंचायत परिसर व सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ व सुंदर असल्याने तालुक्यातील या ग्रामपंचायतला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते त्यामुळे लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांना पुणे येथे वाय बी सेंटर पुणे या ठिकाणी तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले होते , त्या ठिकाणी राज्यातील ओरिसा राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी तेरा अधिकाऱ्यांची निवड झाली , त्यामध्ये लाडजळगावचे सरपंच यांचा समावेश असून त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्या सह शेवगाव तालुक्यातून अभिनंदन केल्या जात आहे ,