*एकनाथराव ढाकणे यांची कॅम्ब्रीज विद्यापीठाच्या मानद पीएचडीसाठी निवड*
वेध ताज्या घडामोडींचा/अहमदनगर प्रतिनिधी दि.20 ( पांडुरंग निंबाळकर )
शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील ढाकणे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे यांना लंडन येथील केंब्रीज डिजीटल विद्यापीठामार्फत ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिले जाणान्या मानद पीएचडीसाठी निवड करण्यात आली आहे. दि.२३/११/२०२४ रोजी त्यांना हा सन्मान गोवा येथील विद्यापीठाच्या पदवीप्रदान दिक्षांत सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.सन २०१० साली शेवगाव तालुक्यातील राक्षी याठिकाणी आपल्या केदारेश्वर ग्रामिण विकास प्रतिष्ठाण, संगमनेर या सेवाभावी संस्थेअंतर्गत के. सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, शेवगाव या नावाने डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी शैक्षणिक संस्थेचे रोपटे लावले. आज या रोपट्याचे रूपांतर सदाहरित वटवृक्षात झाले आहे. दुर्लक्षित ठरलेल्या या भागात उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून या भागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मा. एकनाथराव ढाकणे यांनी कंबर कसली, प्रतिभावंत गरीब होतकरू व कष्टकरी समाजातील मुले तांत्रिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना विविध सोयी-सवलती देण्यात येत आहे.
ढाकणे पॉलिटेक्निक आणि समर्थ आयटीआयच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना माफक दरात व्यावसायिक शिक्षण उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून संस्थेकडे सातत्याने पदवी अभ्यासक्रम सुरू करणेसाठी मागणी होत होती. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे यांनी याबाबीचा सर्वकष विचार करून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मौजे राक्षी ता. शेवगाव येथे समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नावाने पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच सुनिताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मैनेजमेंट (एमबीए कॉलेज) सुरू करण्यात आले आहे. शेवगाव परिसरात पदची / पदविका अभियांत्रिकी / एमबीए महाविद्यालय सुरू होत असल्याने याचा फायदा शेवगाव, पाथर्डी, नेवासा, पैठण, गेवराई, शिरूर (कासार) या भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
यापूर्वीही एकनाथराव ढाकणे यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेच्या माध्यमातून ज्याज्या ठिकाणी नियुक्ती झाली त्याठिकाणी त्यांनी नंदनवन फुलवले. गणोरे ग्रामपंचायत, चंदनापुरी ग्रामपंचायत याठिकाणी त्यांच्या अथक प्रयत्नांतून विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला करून दिला. जागतिक आरोग्य समितीच्या प्रामविकास आणि हगणदारीमुक्ती योजनेबाबत बांग्लादेश आणि पश्चिम बंगाल येथील अभ्यासगटात ढाकणे साहेबांचा समावेश होता, त्यात त्यांनी भरीव योगदान दिले, ढाकणे साहेबांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना थेट कैब्रीज डिजीटल विद्यापीठामार्फत मानद पीएचडी साठी नामांकन मिळाले आहे, ही बाब निश्चितच नगरजिल्ह्यासाठी भूषावह आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिक, पालक, लोकप्रतिनिधी, ढाकणे शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांतजी ढाकणे, समन्वयक ऋषिकेश ढाकणे, संकुलाचे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य डॉ. आर.एच अत्तार, डॉ.ए.डी.डोंगरे, सचिव सौ. जया राहाणे मॅडम, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड, तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ढाकणे साहेबांचे अभिनंदन केले आहे.