आठ वर्षांनंतरही महापालिकेची बससेवा नाही
१५ वर्षात आमदारांनी काय केलं जनतेचा प्रश्न
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,पनवेल मतदार संघात पैशाच्या जोरावर निवडून येणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या 15 वर्षात काय केलं असा सवाल नागरिक करत आहेत. पालिकेवर सत्ता असताना देखील साधी बससेवा सुरू होऊ शकली नाही. आज पनवेलच्या जनतेला प्रवास करायचा असेल तर बेस्ट आणि एनएमएमटी च्या बस सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या १५ वर्षांपासून आ. प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभेचे नेतृत्व राज्याच्या विधिमंडळात करत असल्याने ठाकूर यांनी पनवेल शहराची परिवहन व्यवस्था बळकट करण्यासाठी काय केले असा प्रश्न सामान्य मतदारांकडून विचारला जात आहे. सध्या पनवेलचे हजारो प्रवासी हार्बर रेल्वे तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेची बससेवा (एनएमएमटी) आणि मुंबई महापालिकेची बेस्ट तसेच राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) या सार्वजनिक बससेवेवर अवलंबून आहेत. परंतु पनवेल पालिकेची स्थापना होऊन आठ वर्षे उलटल्यानंतरही पालिकेची स्वत:ची बससेवा सुरू होऊ शकली नाही. लोकसेवेसाठी काय केलं हा प्रश्न येथील मतदार राजा विचारत आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपला योग्य उमेदवार निवडुन विचारपर्वक निर्णय घ्यावा आणि मतदानाचा हक्क बजावाव.
यावेळेस बसपा कडून गजेंद्र आहे शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम दत्तात्रेय पाटील वसंत राठोड, रिपब्लिकन पार्टीचे संतोष पवार अश्या नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पनवेलच्या विकासाचे लक्ष साधावे