विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कालावधीकरिता भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

वेध ताज्या घडामोडींचा/रायगडदि.1८:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 150-ऐरोली, 151-बेलापूर, 188-पनवेल व 190-उरण या विधानसभा मतदार संघामध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान शांत, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पाडावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रकीया पूर्ण होईपर्यंत खालील कृत्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील शस्त्र परवानाधारक यांना शस्त्र, अग्निशस्त्र सोबत बाळगण्यास मनाई करण्यात येत आहे. हा मनाई आदेश शासकीय कर्तव्यावरील पोलीस अधिकारी कर्मचारी व संरक्षण/सुरक्षेकामी नेमलेल्या तत्सम इसमास त्याचप्रमाणे दिर्घकालीन स्थायी कायदा, रूढी व परंपरा यानुसार शस्त्रास्त्रे बाळगण्यास हक्कदार आहे त्या समाजाचे व्यक्तींना लागू असणार नाही. तसेच छाननी समितीने ज्यांना सवलत दिलेली आहे त्या शस्त्र परवानाधारकांना हा मनाई आदेश लागू असणार नाही. ज्या परवानाधारकांना या आदेशान्वये छाननी समितीने सवलत दिलेली आहे त्या परवानाधारकांनी आपली शस्त्रे निवडणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमा दरम्यान उदा. प्रचार, रोड शो, सभा व रॅली प्रसंगी जवळ बाळगू नये. प्रत्येक शस्त्र परवानाधारकास आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने कलम 163 (2) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023  अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे.

हा मनाई आदेश दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी 18.00 वा. पासून ते दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी 24.00 वा पर्यंत लागू राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

●●●●●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *