बालमटाकळीत आज पासून नारायणदास महाराजांच्या सप्ताहाचे आयोजन,
पांडुरंग निंबाळकर
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२,शेवगाव: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील भगवान पंचाळेश्वराच्या कृपाशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ह भ प गुरुवर्य महंत बालकदास महाराज मठाधिपती पांचाळेश्वर संस्थान यांच्या शुभहस्ते आज पासून शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले . सप्ताहासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केले आहे. या पुण्यतिथीचे सातवे वर्ष आहे. गुरुचरित्र रामायण ह भ प लक्ष्मण महाराज राक्षे, श्रीमत भागवत कथा पारायण ह भ प रामेश्वर महाराज चव्हाण हे करणार आहेत. या सप्ताहाचे कीर्तनकार हभप सखाराम महाराज सातपुते, हभप संतोष महाराज भारती, ह भ प अशोक महाराज हाकाळे, ह भ प बाबा गिरी महाराज, ह भ प रामेश्वर महाराज चव्हाण, शिवशाहीर ह भ प कल्याण महाराज काळे, ह भ प गणेश महाराज वारंगे, यांचे कीर्तन होणार असून दि.19 रोजी सकाळी अकरा वाजता मठाधिपती ह भ प महंत बालकदास महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह साठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आव्हान महंत बालकदास महाराज नारायणदास गड बालमटाकळी यांनी केले आहे.