वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,पालघर: मुसळधार पावसामुळे पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गोठणपूर येथील सुभद्रा रिंजड यांचे घर पूर्णपणे कोसळून गेल्याने त्यांच्या घरातील संपूर्ण सामानाचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेबाबत जिजाऊ संस्थेला माहिती मिळताच संस्थेच्या सदस्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली व रिंजड कुटूंबियांना घर उभारण्यासाठी मदत म्हणून १० पत्रे व १२ सिमेंटचे खांब देण्यात आले.