डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दीनानिमित्त सिडकोकडून विनम्र अभिवादन
वेध ताज्या घडामोडींचा/दि.६, नवीमुंबई: आज, ६ डिसेंबर भारतीय संविधनाचे जनक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. देशभरात हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो. सिडकोकडून आज ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल डिग्गीकर, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. शंतनू गोयल, मुख्य दक्षता अधिकारी श्री. सुरेश मेंगडे,सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. विनोद पाटील, सिडको बीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र हिरे, तसेच कर्मचारी यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.