व्यंकटेश फाउंडेशन मार्फत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान
वेध ताज्या घडामोडींचा/पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आज व्यंकटेश फाउंडेशन मार्फत जि.प प्रा.शाळा,बोधेगाव मधील इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यासाठी आर्थिक साक्षरता अभियाना अंतर्गत बँकिंग कामकाजाच्या सहलीचे आयोजन करून प्रत्यक्ष बँकिंग कामकाज कसे चालते ,बँक मध्ये काय सुविधा दिल्या जातात , शाखा व्यवस्थापक ,कॅशिअर,क्लार्क ,यांचे काम कसे चालते , भरणा स्लीप , विड्रा स्लीप, खाते उघडण्याचा फॉर्म, ATM, चेक बुक, तिजोरी, लॉकर हे सर्व प्रत्यक्ष दाखवून माहिती देण्यात आली ,या वेळी मुलांनी त्यांच्या मनातील कुतुहालाचे अनेक प्रश्न विचारले व विविध बाबींची माहिती घेतली. चेअरमन कृष्णा मसुरे यांनी सांगितले की ,व्यंकटेश फाउंडेशनचा हा उप्रकम सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थांना शालेय जीवनात बँकिंग व्यवहार (आर्थिक ज्ञान) शिकवणे व त्यांना आर्थिक साक्षर करणे हा आहे. या अभियानामुळे भारतातील भावी पिढी ही आर्थिक दृष्ट्या सुजान, सुसंस्कृत व जाणीव असणारी व्हावी तसेच लहानपणी म्हणजे शालेय जीवनात बचतीचे महत्त्व समजल्यास सुजाण नागरिक व पैशाचे मूल्य समजणारी पिढी तयार होईल. व्यंकटेश फाउंडेशन हा उपक्रम व्यंकटेश मल्टीस्टेटच्या सर्व शाखेच्या माध्यमातून शाखेच्या परिसरातील इयत्ता ४ थी ते १०वीच्या विद्यार्थी असणाऱ्या शाळेमध्ये राबवणार आहे. व्यंकटेश फाऊंडेशनच्या प्रवासाबाबत कृष्णा मसुरे यांनी सांगितले की, व्यंकटेश उद्योग समूहाने व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीही जपण्याचे ठरवून व्यंकटेश फाऊंडेशनची मुहूर्तमेढ 2015 रोवली. केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगायचं. आज सभोवताली, समाजामध्ये आणि देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सक्षमीकरणाची गरज आहे. त्यात यथाशक्ती योगदान द्यायचं. इतरांनाही या कार्यामध्ये सामावून घ्यायचं. ग्रामीण आणि शहरी भागात, जिथे जिथे काही नवीन काही बदल घडवता येतील तिथे तिथे विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये सळसळता उत्साह आणि आशा जागृत करायची. व्यंकटेश फाउंडेशनने आपल्या कार्याची सुरुवात गोशाळा स्थापनेपासून केली. कामधेनूच्या सेवेतून समृध्दी कशी येते हे प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर मांडण्यात आले. व्यंकटेश फाउंडेशन महिलांना फक्त अर्थपुरवठा करूनच न थांबता त्यांच्यातील कौशल्यवृध्दीवर भर देत आहे. यातून अनेक छोटे छोटे उद्योग उभे राहिले आहेत. उत्पादन केल्यावर त्याला ई कॉमर्सच्या माध्यमातून बाजारपेठही उपलब्ध करून दिली जात आहे. व्यंकटेश फाउंडेशनने शालेय दशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये अर्थसाक्षरतेचे बिजारोपण होण्यासाठी विद्यार्थी बचत बँक, विद्यार्थी ग्राहक भांडार सारखे उपक्रम राबविले आहेत. जवळपास 130 शाळांमधील 20 हजारांहून अधिक विद्यार्थी या बचत बँकेशी जोडले गेले आहेत. व्यंकटेश फाउंडेशनने नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजातील माणुसकीला साद घालत भरीव कार्य केले आहे. लोकसहभागातून पूरग्रस्त, दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात येते.अहमदनगर शहरातील कुठल्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला व नातेवाईकाला 2 वेळेसचा शुद्ध शाकाहारी डब्बा मोफत पोहच केला जातो तसेच आत्मनिर्भर भारतासाठी तरूणाईचा सिंहाचा वाटा असेल. त्यासाठी स्वयंरोजगाराच्या व्यापक संधी तरूणाईपर्यंत पोहचवण्यात व्यंकटेश फाउंडेशन विशेष प्रयत्न करीत आहे. सेवाकार्य संपूर्ण राज्यभरात, देशभरात नेण्याचे ध्येय फाउंडेशनने समोर ठेवले आहे., या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोधेगाव च्या मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम ,ढाकणे मॅडम, बडे सर, मंगेश देहडेक, दादासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर काकडे ,प्रशांत शित्रे, रज्ञानेश झांबरे, परमेश्वर गरड ,राजेंद्र अंतरकर ,व सर्व कर्मचारी उपस्थित होते