-अनधिकृत गरेज धारकांचे फुटपाथवर बस्तान
फुटपाथ मोकळे करा नागरिकांचे पालिकेला आवाहन
वेध ताज्या घडामोडींचा/दि.९ खारघर: अनधिकृत फेरीवाल्यांनी खारघर मधील फुटपाथवर कब्ज्जा निर्माण केला आहे. खारघर खुटूकबांधन चौक, तळोजा जेलच्या समोरील फुटपाथ अनधिकृत फेरीवाले आणि गरेज धारकांनी काबीज केल्यामुळे लोकांनी चालायचे कुटून हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्ते आणि फुटपाथ काबीज केल्यामुळे नागरिकांना मोकळा श्वास घ्यायला जागाच शिल्लक उरली नसल्याचे नागरिक सांगत आहेत. स्थानिक राजकीय नेते हप्याते मिळण्यासाठी या फेरीवाल्यांना थारा देत असल्याचे दिसत आहे प्रत्येक फेरीवाल्यांकडून महिन्याला ठराविक रक्कम घेऊन फुटपाथवर व्यवसाय सुरु करण्यास सांगितले जात आहे.
कुठे पान टपऱ्या, वडापावचा ठेला, कार वाशिंग सेंटर, भाजीपाला व्यवसाय, नारळ विक्रेते, नर्सरी, या प्रत्येकांकडून महिन्याला ठराविक रक्कम घेवून यांना फुटपाथवर व्यवसाय करण्यास सांगितले जाते त्यामुळे खारघर तसेच इतर ठिकाणी फुटपाथ खचाखच भरल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सिडको आणि पनवेल महानगर पालिकेकडे यासंदर्भात अनेकदा तक्रार करूनही या फेरीवाल्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहे.
इथल्या उंच गगनचुंबी इमारती नागरिकांचे लक्ष जरूर वेधून घेतात ,मात्र परिसरातील रस्ते आणि फुटपाथवर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आम्ही कुटून चालायचे फुटपाथ चालण्यासाठी आहेका फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी आहेत असा सवाल व्हलीशिल्प तसेच स्वप्नपूर्ती मधील नागरिक करत आहेत. सदर फेरीवाल्यांवर कारवाई करून फुटपाथ लोकांसाठी मोकळे करावेत अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.