आयुर्वेदीक दिनानिमित्त विशेष लेख
स्थौल्य किंवा स्थूलता आणि वंध्यत्व हा जगभर भेडसावणारा प्रश्न- डॉ. सीमा मेहेरे, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ
वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,नवीमुंबई: स्थौल्य किंवा स्थूलता आणि वंध्यत्व हा सध्या जगभर सगळ्यांनाच भेडसावणारा कठीण प्रश्न झालाय . अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हि समस्या सर्व जनतेला त्रास देऊ लागली आहे . लठ्ठपणा मुले विविध शारीरिक आणि मानसिक सुद्धा आजार होतात हे सर्व श्रुत आहे . परंतु वाढलेल्या वजना मुळे एखाद्याला मूल होऊ शकत नाही किंवा मुलं होण्यास प्रॉब्लेम होतो हे अजूनही खूप लोकांना माहित नसतं आणि तोच या लेखाचा प्रपंच आहे . स्थौल्य हि नुसती सौंदर्याची आणि आरोग्याची समस्या न राहता ती आता आपल्या जीवनाच्या इतरही गोष्टींवर परिणाम करू लागली आहे .
तर आता स्थौल्या मुळे वंध्यत्व कसे येते आणि त्याचे उपाय काय आहेत याचा विचार आता आपण करणार आहोत .
या आधी स्थौल्य म्हणजे नक्की काय हे आधी आपण समजून घेऊ . वर्ल्ड हेअल्थ ऑरगॅनिझशन प्रमाणे स्थूलता म्हणजे ओबेसिटी हि तेव्हाच म्हटली जाते जेव्हा बीएमआय वरच्या स्तराला जातो . ह्याची value आहे १८.५ ते २४.९ . याच्या वर म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट ची गरज असते .
या वरून एवढे लक्षात आलेच असेल कि नुसती एखादी मुलगी किंवा मुलगा जाड असणं म्हणजे तो किंवा ती स्थूल आहे असा अर्थ होत नाही . म्हणूनच आयुर्वेदाने सुद्धा स्थूलयाची वेगळी व्याख्या करून त्याला मेदोरोग अशी संज्ञा दिली आहे .
मेदासो आवृत मार्गत्त्वात …….
असा एक श्लोक या संदर्भात महत्वाचा आहे .
ग्रंथकार असे म्हणतात कि ज्याचा मेद वाढलेला आहे त्या व्यक्तीची बाकीची स्रोतसे किंवा सिस्टम्स वरही परिणाम होतो . रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणि शुक्र अशी ७ स्रोतसे आपल्या शरीरात असतात . आपण जे काही अन्न खातो ते पचल्यानंतर त्याच्या पासून जो आहार रस निर्माण होतो तो मेदस्वी माणसांमध्ये फक्त मंदा कडेच जातो आणि इतर धातूंचे त्यामुळे कुपोषण होते . वाढलेल्या फाजील मेदा मुळे नारंगी धातूंवर त्याचे आवरण येते आणि आहार रस फक्त माडिआ कडेच गेल्याने मेदस्वी व्यक्ती अजूनच जाड होऊ लागते . म्हणूनच आपण व्यवहारात हे वाक्य खूप ऐकतो पेशंट कडून कि मी एवढंसं काही खाल्लं तरी फट्कन माझं वजन वाढतं.
एखाद्या व्यक्तीचे वजन वाढण्यामध्ये त्याच्या प्रकृतीचा पण खूप मोठा वाटा असतो . आयुर्वेदानुसार कफ प्रकृती ची लोकं हि मुळातच डबल हाडाची किंवा जरा गोल matol असतात . पण म्हणून ते स्थूल असतीलच असे नाही . पित्त प्रकृतीचे लोक मध्यम आकृतीचे आणि चपळ असतात . स्वभावाने पण धडाडी कर्तृत्व डॅशिंग असतात . त्यामुळे वजन वाढले तरी ते लगेच उपाय करून नॉर्मल वर पण लवकर येतात . कारण त्यांचं मेटॉबॉलिसम किंवा चयापचय क्रिया खूप चांगली असते . वात प्रकृती च्या व्यक्ती अति हडकुळे किंवा अति जाड पण असू शकतात . त्यांचे वजन लवकर कमी पण होते आणि वाढते पण . मनाने या व्यक्ती खूप चंचल आणि डिप्रेशन कडे जाऊ शकत असल्याने वाढलेलं वजन कमी करणे त्यांना सोप्पं नसतं .
मॉडर्न शात्राप्रमाणे सुद्धा याचा खूप मोठा अभ्यास आहे . त्यांच्या प्रमाणे बायकांमध्ये पी सी ओ डी सारखे विकार असतात त्यांना वजनवाढ चेहेऱ्यावर पुरुषांसारखी दाट लव येणे पाळी अनियमित येणे आणि लग्न झालेले असल्यास मूल न होणे असे त्रास सुरु होतात . या मध्ये बरेचदा लठ्ठपणा आणि अनियमित रज : प्रवृत्ती हीच लक्षणे आधी दिसतात . त्यावरून डॉक्टरांना लगेच शंका येते कि हि रुग्णा
pcod ची असावी . याच्या जोडीला सोनोग्राफय रक्ताच्या विशिष्ट हार्मोन्स च्या तपासण्या हे सगळं मिळून निदान होतं
वंध्यत्व आणि स्थूलतेची महत्वाची कारणं खालीलप्रमाणे आहेत.
१. थायरॉईड चे विकार
२. पी . सी. ओ . डी
३. मधुमेह
४. डिप्रेशन
५. प्राकृतिक ( जन्मतः च अति वजन असणे ) चाईल्ड हूड ओबीसीटी .
आयुर्वेदानुसार मेदोरोग आणि वंध्यत्वा सोबतच अष्टौ निंदित म्हणून प्रकार वर्णन केले गेले आहेत
इह खलु शरीरमधिकृत्याष्टौ पुरुषा निन्दिता भवन्ति; तद्यथा- अतिदीर्घश्च, अतिह्रस्वश्च, अतिलोमा च, अलोमा च, अतिकृष्णश्च, अतिगौरश्च, अतिस्थूलश्च, अतिकृशश्चेति||३||
या मध्ये अति गोरा -अति काळा
अति उंच – अति बुटका
अलोम – अतिलोम
अति स्थूल – अति कृश
या मध्ये सुद्धा चरकाचार्यांनी अति वजन असणे वाईट आणि अति कृश हि वाईट असे वर्णन केले आहे .
ट्रीटमेंट / चिकित्सा
१. ट्रीटमेंट आयुर्वेदिक असो कि ऑलोपॅथिक – खालील सूत्र महत्वाची ठरतात
कारण मुळात स्थूलता हा एक लाईफ स्टाईल डिसऑर्डर आहे
म्हणजेच चुकीची जीवन शैली हेच त्याचं कारणही आहे आणि उपाय पण आहे . आणि म्हणूनच तो जेवढा समजायला सोप्पा तेवढाच आचरणात आणायला अवघड आहे .
तर प्रथम आपण आयुर्वेदिक उपाय बघू .
१. औषधे
२. आहार
३. विहार – व्यायाम
औषधे इथे जास्त सांगणे योग्य नाही कारण ती आयुवेदानुसार व्यक्ती परत्वे बदलतात . तरी पण सर्व साधारणपणे गुग्गुळ कल्प , आरोग्य वर्धिनी सारखी शोधन द्रव्य , थायरॉईड असेल तर कांचनार गुग्गुळ , कुंभजतु , असनाद टॅबलेट वैगेरे बरीच औषधे मिळतात . परंतु हि सर्व औषधे आपल्या आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्याव्या .
पंचकर्म
पंचकर्म शिवाय आयुर्वेद पूर्ण होतंच नाही
व्हेट लॉस साठी वमन विरेचन बस्ती असे विविध पंचकर्माचे प्रकार आहेत . सध्या वासंतिक वमनाची शिबिरं सर्व आयुर्वेदिक सेंटर्स मध्ये भरत आहेत त्याचा वाचकांनी जरूर फायदा घ्यावा .
हे पंचकर्म नीट केल्यास ४-५ किलो वजन नक्की कमी होते
२. आहार – या मध्ये शक्यतो गोड पदार्थ गव्हाचे पदार्थ टाळावेत . सध्या आपल्या सरकारने सुद्धा मिलेट्स धान्य खाण्यावर जोर दिला आहे व तो योग्यच आहे . जारी बाजरी रागी सत्तू जव या सगळ्याने भूक भागते पोषण मूल्य मिळतात पण वजनही वाढत नाही म्हणून त्याचा मॅजिक फूड म्हणून प्रचारही केला जात आहे .
३. व्यायाम – आयुर्वेदानुसार व्यायाम हा अर्ध शकत्या असावा असे म्हटले आहे . म्हणजेच जितकी कॅपॅसिटी आहे त्याच्या अर्धा करावा . आणि दुसरं महत्वाचं म्हणजे थंडीच्या दिवसात ( विसर्ग काळामध्ये ) सुरु करावा. कारण या काळामध्ये निसर्ग आपल्याला शक्ती देत असतो . त्यामुळे अतियोग टळतो आणि व्यायाम सहन पण होतो आणि वजन कमी पण होते . हे सूत्र आजकालच्या जिम वेड्या पब्लिक साठी खूप महत्वाचे आहे . कारण हिरो किंवा हिरोईन सारखी शरीर यष्टी बन वण्याच्या नादात नको ते शॉर्टकट्स मुलं मुली घ्यायला लागतात . मग कोणी प्रोटीन पावडर खाणार किंवा हर्बल च्या नावाखाली कुठली तरी धोकादायक पावडर खाणार -एका वेळच्या जेवणा ऐवजी ….असे बरेच चित्र विचित्र प्रकार बघायला मिळतात . याचे कधी साधे तर कधी मृत्यू सारखे भयंकर परिणाम पण दिसतात . कीतीतरी हिरो किंवा सेलिब्रिटींच्या बाबत आपण अशा बातम्या ऐकल्यात कि जिम मध्ये वर्क आऊट करतानाच हार्ट अटॅक आला आणि प्राण गेला . त्याचं महत्वाचं कारण हेच – अर्ध शकत्या व्यायाम ना करणं.
म्हणून व्हेट लॉस साठी जिम जरी लावली तरी आधी फ्री ट्रायल असते ती घ्यावी . थोडे दिवस सगळं डाएट वैगेरे जमतंय का ते बघावं आणि मग नियमित पाने करावं.
आयुर्वेदाने योगासनं सांगितली आहेत . त्याचा जरूर वापर करावा. परंतु इथे सुद्धा काळजी घ्यावी कि योग्य गुरु कडूनच शिकून घ्यावे आणि मग करावे . नाहीतर योगा करताना पण स्प्रेन झाला असे अनुभव येतात .
-:लेखक:स्थौल्य आणि वंध्यत्व
डॉ . सीमा मेहेरे
professor अँड HOD
स्त्री रोग प्रसूती तंत्र विभाग
डॉ . जी . डी. पोळ फौंडेशन
वाय एम टी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय