नेरूळमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
वेध ताज्या घडामोडींचा/दि.२६,नवीमुंबई:नेरुळमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी आणि सार्व.गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून तेरापंथी युवक परिषद यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन मा.सभागृह नेते तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.रविंद्र इथापे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विभागातील अनेक नागरिकांनी रक्तदान शिबिराचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष श्री सुनिल होनराव,श्री अशोक चटर्जी,तेरापंथी युवक परिषदेचे अध्यक्ष श्री कांतीभाई कोठारी,श्री प्रविण जैन,महेश बाफना,सुरेश सिंघवी,मनोज बदाला,दिनेश धोखा,रमेश मदरेचा, मुकेश बोहरा,दिलीप सिंघवी,प्रकाश बोहरा, देवेंद्र बोधा,धनराज सोनी,पियुष बाम,सुदेश सिंघवी व इतर मान्यवर उपस्थित होते.
नेरूळमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
