●केमिकल मिश्रित दूषित पाणी जनावरांच्याही जीवावर,
●तळोजातील नावडेत 8 शेळ्यांचा दूषित पाणी पिऊन मृत्यू
वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,तळोजा: तळोजा एमआयडीसी तील कंपन्यांनी नदीत सोडलेल्या केमिकल युक्त पाणी पिल्याने नावडे येथील बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
येथील प्रदूषणामुळे नागरिक अगोदरच त्रस्त झाले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घेणेही मूहकिल झाले आहे. रोडपली, तळोजा, नावडे,कलंबोली, पनवेल,खारघर, आणि आजूबाजूची बहुतेक गाव प्रदूषणामुळे त्रस्त झाली आहे. कित्येक नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे येथील नागरिक रोज मरत आहे. प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे येथील नागरिक जगण्यासाठी श्वास घेत नसून तो श्वास घेऊन मृत्यू जवळ करत असल्याचे दिसत आहे.
येथील प्रदूषणामुळे नागरिक तर त्रस्त आहेतच परन्तु येथील मुके प्राणी देखील सुरक्षित राहिले नाहीत त्यांना आपल्यासारखे बोलता येत नाही. शेतकऱ्यांच्या बकऱ्या गवत खात असताना तळोजातील केमिकलयुक्त पाणी पिल्या आणि त्यांचा या केमिकलयुक्त पाण्यामुळे मृत्यू झाल्याचे नावडे येथील शेतकरी अनंता बुधा म्हात्रे यांनी सांगितले आहे. येथील प्रदूषणाविषयी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी अनेकदा आवाज उठवला मात्र परिस्थिती जैसे थे आहे. पनवेल महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ नागरिकांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिक सांगत आहेत. आज बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत उद्या नागरिकांवर ही वेळ येण्याची शक्यता आहे. लोकांच्या जीवाशी खेळू नका अशी आर्त विनवणी लोक स्थानिक प्रशासनाशी करत आहेत