रानसई आणि वेश्वी आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना केलं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८ पनवेल:  दूर – दुर्गम ,डोंगर – दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासीं  बांधवांच्या घरची बेताची परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत त्यांच्या रोजी – रोजगाराची साधनंच उध्वस्त होऊन त्यांचं जगणंच मुश्किल झालेलं आहे या परिस्थितीत त्या आदिवासीं बांधवांच्या सुख – दुःखात त्यांच्या हाकेला धाऊन जावून त्यांना मदतीचा हात देणारे. जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे.अध्यक्ष  प्रितम म्हात्रे यांच्या औदार्यातून…आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक  राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून … आज …उरण – रानसई येथील … *चांदयली आदिवासींवाडी, …भुऱ्याचीवाडी, …मार्गाचीवाडी, बंगल्याचीवाडी,…सागाचीवाडी*  …आणि … *वेश्वी आदिवासींवाडी* या आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना …*तांदूळ, गव्हाचपीठ,साखर, डाळ, मीठ,चहापावडर, साबण, बिस्किटं* … या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं गेलं …आणि… महिला भगिनीं करिता *साड्यांच* वाटप देखील करण्यात आले.
         राजकारण आणि समाजकारण यांची योग्य ती सांगड घालत आपल्या सेवाभावी स्वभावाने सामाजिक कार्याचा वसा जपणारे जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचेअध्यक्ष श्री.प्रितमदादा म्हात्रे साहेब यांनी आज पर्यंत समाजातील गोर – गरीब ,दुर्लभ घटकांना,आदिवासीं बांधवांना सदैव मदतीचा हात देऊन त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या करिता संकट समयी एक आशेचा किरण बनून त्यांच्या पुढे उभे असतात त्याच सोबत राजू मुंबईकर  हे सुध्दा आपलं सामाजिक दायित्व जपतं या आदिवासीं बांधवांकरिता सदैव झटत असतात आणि याच सामाजिक जनिवतेतून आज या आदिवासीं वाड्यांवर साकारलेल्या मदतरुपी अन्न – धान्य वाटप कार्यक्रमा दरम्यान आदिवासीं बांधवांनां मिळालेलं हे शिदोरीसाठीचं सामान घेऊन जाताना त्या माय भगिनिंच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद पाहण्या जोगा होता .
      जे.एम.म्हात्रे.चॅरिटेबल संस्था पनवेलचे प्रितमदादा म्हात्रे  यांच्या औदार्यातून आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक  राजू मुंबईकर साहेब यांच्या माध्यमातून साकारलेल्या या मदतरुपी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप कार्यक्रमा करिता उपस्थिती दर्शविली ती केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष  स्नेहलजी पालकर साहेब आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था उरण तालुका सचिव अनिल  घरत, वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद दादा पाटील, कॉनचे वेश्वी शाखा अध्यक्ष सुरेन्द्रजी पाटील, गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडेचे मा अध्यक्ष नवनीत पाटील मित्र परिवाराचे कार्याध्यक्ष क्रांती म्हात्रे युवा कार्यकर्ता रचित म्हात्रे,मयुरेश पाटील,हिमांशू पाटील, दिपक दोरे आणि सर्व आदिवासीं बांधवांच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *