जी-२०परिषद
म्हणजे नेमकं काय? कशामुळे महत्त्वाची आहे ही बैठक? जाणून घ्या
वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या जी 20 परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. जगातील ताकदवर देशाचे प्रमुख राजधानी दिल्ली येथे असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
९ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या या जी २० समुहाच्या शिखर परिषदेसाठी सर्व तयारी पुर्ण झाली आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर होणाऱ्या या जी २० परिषदेला अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदा जी २० परिषदेचे अध्यक्ष पद भारत भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची भारतासाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे जी २० परिषद?जी-२० सदस्य देशांचा समुह असून हा जागतिक GDP च्या अंदाजे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या बाबतीत ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतात. जी-२० देशांच्या परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.जी -20 चे हे समीट शिखर परिषद म्हणून ओळखले जाते. या परिषदेत मुख्य दहशतवाद, आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर भर दिला जातो.
जी 20 सदस्य देशअर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनाडा, चीन, जर्मनी, फ्रांस, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान, मेक्सिको, रूस, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम, अमेरिका आणि यूरोपीय संघचा समावेश आहे.भारतात परिषदेला कोण कोण येणार?अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक, जापान चे पंतप्रधान फिमियो किशिदो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बनीज, जर्मन चांसलर, फ्रांसचे राष्ट्रपति इमैनुएल मैक्रों, दक्षिण अफ्रीका, तुर्की आणि अर्जेंटीनाचे राष्ट्रपती भारतात येणार आहे.