आज ७ सप्टेंबर जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनारचे आयोजन,
आरोग्यविषयक जनजागृती वेबिनार
वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,मुंबई:आज ७ सप्टेंबर जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्त वातावरण फाउंडेशन या सामाजिक संस्थेने हवा प्रदूषणाच्या विषयावर लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ऑनलाइन वेबिनार चे आयोजन केले आहे.
हवा प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात हे सर्वसामान्य नागरिकांना समजावेत या उद्देशाने आज ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजता ऑनलाईन बेबीनारचे आयोजन केले आहे.
क्लीन एअर फॉर ब्लू स्काइस या आंतरराष्ट्रीय दिवसा प्रसंगी वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर डॉक्टरांशी संवाद
मार्गदर्शन :
डॉ. अमिता आठवले,एमडी (टीबी आणि छाती) छाती आणि क्षयरोग तज्ञ, केईएम हॉस्पिटल, डॉ.शर्वरी राठोड, एमबीबीएस, टीडीडी, डीएएआई चेस्ट फिजिशियन आणि ऍलर्जी तज्ञ,
ब्रीद इझी, चेस्ट आणि ऍलर्जी क्लिनिक, डॉ. संजीव मेहता, एमडी , एफसीसीपी, एफएपीएसआर
पल्मोनोलॉजिस्ट,लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, डॉ. अदिती शहा, डीएनबी, डीसीएच सल्लागार बालरोगतज्ञ, नानावती मॅक्स सुपर विशेष रुग्णालय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक:
रिमा सदाशिव अमरापूरकर करणार आहेत.
७ सप्टेंबर, २०२३
संध्याकाळी ६:०० ते ७:०० वाजेपर्यंत
चर्चेचे विषय:
१. श्वसन रोगांचे ट्रेंड
२. इतर अवयव प्रणालींवर परिणाम
३. सांख्यिकी आणि संशोधन निष्कर्ष
४. प्रतिबंधात्मक उपाय आणि शिफारसी
जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://us02web.zoom.us/j/81105481400
आज आपण मुंबई सारख्या पोल्यूशन युक्त शहरामध्ये राहतो परंतु या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर किती महा भयंकर परिणाम होतात याची आपल्याला कल्पनाही नसते.
त्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे यासाठी मुंबईतील विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर ऑनलाइन वेबिनार च्या माध्यमातून आपल्याला प्रदूषणाच्या परिणामांविषयी जागृत करणार आहेत तरी आपण या वेबिनार मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वातावरण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.