रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पत. लि अलिबागची ९९  वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,पनवेल : रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पत. लि अलिबाग यांच्या ९९  वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.के.हायस्कुल येथे पार पडली. या पतसंस्थेचा १०० वा शतक महोत्सवास मोठ्या उत्साहात साजरा करू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या बाजूला बसण्याचे मला भाग्य या संस्थेच्या सभासदांमुळे लाभले या बद्दल मी साऱ्यांचे आभार व्यक्त करतो. या पत संस्थेचा आलेख गगन भरारी घेईल याच शुभेच्छा देत या सभेला पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी संबोधित केले. 
       या सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू .डॉ भिमराव आंबेडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती .नारायणशेठ घरत साहेब, शिक्षक पतपेढी अलिबाग मा.चेअरमन सौ.चंचला धनावडे, रा.जि.प प्राथमिक शिक्षक परिषद अध्यक्ष श्री.विजय पवार, मा.संचालक शिक्षक पतपेढी श्री.पि.टी भोपी, रा.जि. प शिक्षक संघ अध्यक्ष श्री.सुभाष भोपी, रा.जि. प शिक्षक संघ अध्यक्ष श्री.राजेंद्र म्हात्रे, प.ता.प्रा शिक्षक परिषद मा.अध्यक्ष मा.श्री.सुनील साळवी, सहकार पॅनल प्रमुख श्री.उदय गायकवाड, धमोळे शाळा मुख्याध्यापक श्री. भालचंद्र पाटील, शिक्षक पतपेढी अलिबाग, चेअरमन श्री.सुनील महादेव वाघमारे, व्हा.चेअरमन श्री.निलेश साळवी, मानद सचिव श्री.राजेंद्र पाटील व सर्व सभासद शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *