रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. भावेश जोशींना दोन लाख रुपयांची मदत 

वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,पनवेल:  परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील डॉ. भावेश कृष्णा जोशी यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. 

          सदरचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. भावेश यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कामोठे भाजप मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक बबन मुकादम आदी उपस्थित होते. 
          सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या २५ पेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. डॉ. भावेश जोशी जर्मनी देशात ‘मास्टर्स इन सर्जरी-जनरल सर्जरी विथ रोबोटिक’ या कोर्सचे शिक्षण घेणार आहेत. त्यांनी आर्थिक मदतीकरिता विनंती अर्ज केला होता, त्या अनुषंगाने त्यांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *