हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेची घेतली दखल
वेध ताज्या घडामोडींचा/दि.२,नवीमुंबई: सिडको वसाहतीत एक सर्व सामान्य घरात जन्माला आलेली गौरवी हिने आपल्या हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर युनायटेड किंगडम (लंडन) येथील युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती मिळवण्यात यश संपादन केले आहे. तिच्या या हुशारीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सिडको वसाहतीतील हिमालय सोसायटीतील रहीवाशी व सामाजिक कार्यकर्ते रमेश म्हस्के यांची कन्या गौरवी हिने पनवेलमधील पिल्लई कॉलेजमध्ये अकांऊट आणि फायानन्समध्ये डिग्री संपादन केली आहे. गौरवी हिच्या हुशारीची व बुध्दीमत्तेची दखल घेत युनायटेड किंगडम (लंडन) येथील वित्त विद्यापिठ कार्डीफ मेट्रोपॉलिटन युनिर्व्हसिटी यांनी तिला शिष्यवृत्ती जाहिर केली आहे. आपल्या सिडको वसाहतीच्या कन्येच्या हुशारीची लंडनच्या विद्यापिठाने दखल घ्यावी ही आम्हा सिडको सदनिकाधारकांसाठी खरोखरीच भूषणावह बाब आहे. गौरवी हि पुढील शिक्षणासाठी अकौंटंट आणि फायानन्समध्ये पदव्युत्तर पदवीसाठी ९ सप्टेंबर रोजी ती लंडनला जाणार आहे. गौरवीला शिष्यवृत्ती मिळाल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.