फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका- प्रितम म्हात्रे,विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका

“न्यू होरायझन पब्लिक स्कूल विरोधात पालक आक्रमक”

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१ ,पनवेल : खांदा कॉलनी पनवेल येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूल मध्ये शाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय दुसऱ्या सत्राची  फी आगाऊ भरण्यासाठी सांगण्यात येते. विद्यार्थ्यांकडे असलेल्या नोट द्वारे पालकांपर्यंत लिखित स्वरूपात सदर गोष्ट कळवली जाते. असे असताना सुद्धा शाळा जर एखाद्या पालकाने फी उशिरा भरली तर दंड आकारतात. ऑक्टोबर महिन्यापर्यंत दुसरे सत्र संपत असल्याने जर ऑक्टोबर नंतर ही भरली तर आपण शालेय शिक्षण नियमानुसार शाळेने नक्कीच दंड घ्यावा. परंतु आगाऊ रक्कम गोळा करण्यासाठी शाळेमध्ये स्पीकर द्वारे अनाउन्समेंट केली जाते फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे आली आहे. 1 ऑगस्ट रोजी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना फोन लावून अर्जंट मध्ये बोलवून घेऊन फी संदर्भात विचारणा केली गेली हे अत्यंत दुर्दैवी आहे असे श्री प्रितम म्हात्रे यांनी सांगितले. 
        अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांनी काही चुकीची पावलं उचलली तर त्याला सर्वस्वी जबाबदारी कोणाची? यासंदर्भात शाळेशी संपर्क साधून त्यांनी पालकांशी वैयक्तिक पातळीवर बोलून फी संदर्भात चर्चा करावी. या गोष्टीमध्ये मुलांना वेठीस धरू नये असे शाळा प्रशासनाला सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी शासनाच्या संबंधित शिक्षण विभागाशी संपर्क साधून त्यांच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून या शाळांच्या चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे सांगितले आहे.
     
प्रतिक्रिया:
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत परीक्षेला बसणे हा सर्व विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु स्वयंघोषित निर्णय लावून त्यांना परीक्षेत बसण्यास जर अडचण निर्माण करून पालकांवर फी च्या पैशासाठी दबाव आणला जात असेल तर हे कदापि शेतकरी कामगार पक्ष सहन करणार नाही. शाळा प्रशासनाने थेट पालकांशी संवाद साधून चर्चा करावी यात विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये
-प्रितम जनार्दन म्हात्रे ,मा.विरोधी पक्षनेता.पनवेल महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *