लोकसेवा कार्यप्रणालीची आसामच्या अभ्यासगटाने प्रत्यक्ष पाहणी करीत व्यक्त केले समाधान

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,नवीमुंबई: महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या लोकसेवा प्रणालीची माहिती जाणून घेण्यासाठी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अभ्यास गटाने नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेस भेट दिली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या 51 लोकसेवांच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती जाणून घेतली व वाशी विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन लोकसेवा वितरण कार्यवाहीची प्रत्यक्ष पाहणी केली.

या अभ्यास दौ-याप्रसंगी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीम. पांचाली ककाती तसेच उपसचिव श्रीम. मिताली लाहकर यांच्यासमवेत राज्य सेवा हक्क आयोगाचे कोकण महसुली विभागीय आयुक्त श्री. बलदेव सिंह आवर्जुन उपस्थित होते. त्यांनी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारी लोकसेवा वितरण कार्यवाहीची पध्दतीबारकाईने जाणून घेतली आणिपुरविल्या जाणा-या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करावी अशा सूचना दिल्या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सदयस्थितीत शासन निर्देशानुसार 51 लोकसेवा पुरविल्या जात असून त्यापैकी 28 लोकसेवा ऑनलाईन पुरविल्या जात आहेत. आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीम. पांचाली ककाती तसेच उपसचिव श्रीम. मिताली लाहकर यांनी लोकसेवा वितरणाचीकार्यवाही जाणून घेताना त्याविषयी प्रत्यक्ष वितरण कार्यप्रणाली पाहण्यासाठी वाशी विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राला भेट दिली. 

      याठिकाणी लोकसेवांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी अभ्यासगटाने संवाद साधला. त्याचप्रमाणे रांगेत उपस्थित असलेल्या श्री. अमित तिवारी यांच्या श्रेया नामक मुलीचे जन्म प्रमाणपत्रमिळविण्यासाठी अर्ज दाखल करण्यापासून प्रमाणपत्र घेण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही बघितली. यावेळी राज्य सेवा हक्क आयोगाचे कोकण महसुली विभागीय आयुक्त श्री. बलदेव सिंह यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत लोकसेवा लाभार्थी श्री. अमित तिवारी यांना मुलीचे जन्म प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ यांच्या उपस्थितीत वाशी विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीम. पांचाली ककाती तसेच उपसचिव श्रीम. मिताली लाहकर यांना लोकसेवांबाबतच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या लोकसेवांबाबत विहित कालावधीतील कार्यप्रणालीबद्दल अभ्यासगटाकडून प्रशंसा करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *