आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्या वाटप
वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३, पनवेल: पुढील शैक्षणिक वर्षांपासून आजिवली येथील जनता विद्यालयातील दहा गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून येथील विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी दोन हजार लिटरची सिंटेक्स टाकी देणार असल्याची घोषणा जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी केले.
श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आजिवली येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालययातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, गोविंद पाटील, नाना भागीत, कान्हा कडव, राम पाटील, प्राचार्य श्री. चवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र पाटील यांनी, दरवर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल व आजूबाजूच्या परिसरात एक लाखहून अधिक वह्या मोफत दिल्या जात असल्याचे सांगितले. त्याच अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण विद्यालयाला पाण्याची दोन हजार लिटर टाकी देत असल्याचे सांगून पुढील शैक्षणिक वर्षांपासून या विद्यालयातील गरीब गरजू वविद्यार्थ्यांना माझा मित्र कै. चेतन गोविंद जाधव याच्या स्मरणार्थ होतकरू दहा विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच श्री. ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळाने जनता विद्यालयाला एक लाख रुपयांचे तर भाजपचे युवा नेते दशरथ म्हात्रे यांनी ६५ हजार रुपयांचे बेंचेस दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. आणि त्या अनुषंगाने त्यांना कृतज्ञता पत्र देण्यात यावे असे मुख्याध्यापक चवरे सर यांना सांगितले जेणेकरुन यापुढे पण जास्तीत जास्त दानशूर व्यक्ती पुढे येऊन विद्यालयाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील, असेही राजेंद्र पाटील यांनी अधोरेखित केले.