नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने वाचवले असंख्य जीव; ५३३ सॉलिड अवयव प्रत्यारोपण

वेध ताज्या  घडामोडींचा/दि.२२ नवीमुंबई: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ५३३ सॉलिड अवयव प्रत्यारोपण पूर्ण करुन एक इतिहास घडवला आहे.  नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सप्लांटमधील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक अशा अत्याधुनिक बहु-अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमामुळे हे यश प्राप्त झाले असून  २०१७ पासून या हॉस्पिटल्सने ३२७ मूत्रपिंड प्रत्यारोपण, १९८ यकृत प्रत्यारोपण आणि ८ हृदय प्रत्यारोपण केले आहेत.

अपोलोचे वेगळेपण जपणारा एक महत्वाचा पैलू म्हणजे प्रत्यारोपणाच्या रुग्णांना वैयक्तिक उपचार प्रदान करणारी एक विशेष प्रत्यारोपण टीम. एकत्र आलेल्या टीमध्ये प्रत्यारोपण शल्यविशारद, नेफ्रॉलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, पेडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, बालरोग शल्यचिकित्सक, भूलतज्ञ, अतिदक्षता तज्ञ, चिकित्सक, पल्मोनोलॉजिस्ट, संसर्गजन्य रोगाचे सल्लागार, इम्यूनोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, प्रत्यारोपण समन्वयक आणि प्रशिक्षित आयसीयू वॉर्ड परिचारिका आणि संपर्क अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्व व्यावसायिकांना जीवन-संरक्षक अतिदक्षता तंत्रज्ञानाद्वारे सहकार्य प्राप्त होते. अपोलोच्या सॉलिड अवयव प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमात हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाचा समावेश आहे, यामध्ये विशेष अवयव प्रत्यारोपण टीमचा देखील समावेश आहे, जे मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ९९. ९  टक्के आणि यकृत प्रत्यारोपणासाठी ९४ टक्के यशाचा दर प्रदान करण्याच्या दृष्टीने आमच्या रुग्णांना वैयक्तिकृत, सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी अथक परिश्रम करतात. यशाचा उच्च दर म्हणजे टीमच्या समर्पणाचा आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा दाखला आहे. वेदनेवर नियंत्रण आणि व्रण लवकर बरे होणे अशा प्रकारची जलद रोगमुक्तता होऊ शकते आणि शस्त्रक्रियेनंतर चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. कोविड महामारीच्या काळातही संक्रमणाच्या नियंत्रणाच्या कठोर शिष्टाचाराचे पालन करत प्रत्यारोपणामुळे अनेक प्राण वाचवले आहेत.

अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिमी क्षेत्राचे यकृत आणि एचपीबी प्रोग्रामचे मुख्य सल्लागार डॉ. प्रा. डॅरियस मिर्झा यांनी या यशाबद्दल अभिमान आणि समाधान व्यक्त करताना म्हंटले कि, “शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपण ही जीवन वाचवणारी प्रक्रिया असून यामुळे जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते. अपोलोच्या यकृत प्रत्यारोपण विभागाने नेहमी उत्कृष्ट परिणाम देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे यूरोलॉजी, यूरो-ऑन्कोलॉजी, मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि रोबोटिक शस्त्रक्रियेचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमोल कुमार पाटील म्हणाले कि, “अपोलो येथील आमचा मूत्रपिंड प्रत्यारोपण कार्यक्रम मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा एक आधारस्तंभ ठरला आहे. कल्पकता, समर्पण आणि रुग्णाची अतुलनीय काळजीद्वारे आम्ही मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *