नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंगळवार दिनांक 08/08/2023 रोजी मुख्य जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सदर जलवाहिनीवरील पाणी पुरवठा 8 ऑगस्ट 2023 रोजी बंद राहणार आहे.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात दिनांक 08ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणीपुरवठा देखील बंद राहील. त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
तरी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.